MLA Kashiram Pawara while discussing with banana farmers  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : नुकसानग्रस्त शेतीचा आमदारांनी केला दौरा; पंचनाम्यांचे आदेश

Dhule : तालुक्यातील अर्थे, विखरण परिसरात १ मार्चला तुफानासह पावसामुळे झालेल्या शेतीच्या हानीची पाहणी आमदार काशीराम पावरा यांनी केली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : तालुक्यातील अर्थे, विखरण परिसरात १ मार्चला तुफानासह पावसामुळे झालेल्या शेतीच्या हानीची पाहणी आमदार काशीराम पावरा यांनी केली. प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी शासनस्तरावरून मदत मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले.

अर्थे, विखरण, कुवे, वाडी, वाघाडी परिसरात १ मार्चला दुपारी मोठे वादळ आणि पाऊस झाला. त्यात केळी व पपईच्या बागा उद्‍ध्वस्त झाल्या. (Dhule MLA Kashiram Pawar inspected damage to agriculture caused by storm and rain)

कापलेला शेतमाल, शेतातील मका, गहू, बाजरी, हरभरा यांना मोठा फटका बसला. शेतीत मोठी गुंतवणूक केली असतानाच अस्मानी आपत्ती कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान, शनिवारी (ता. २) सकाळपासून आमदार काशीराम पावरा यांनी बाधित क्षेत्रांना भेट देऊन शेतकऱ्यांचे सांत्वन केले.

त्यांच्यासोबत धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, पंचायत समितीचे माजी उपसभापती दीपक गुजर, डॉ. शशिकांत पाटील, मनोहर पाटील, प्रल्हाद पाटील, बाळू चव्हाण, अनिल चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, प्रवीण पाटील, श्याम पाटील, कंवरदास पाटील, संजय पाटील, मगन धनगर, मनोहर पाटील दौऱ्यात सहभागी झाले. (latest marathi news)

मदतीचे आश्वासन

शेतकऱ्यांनी झालेल्या हानीबाबत आमदार पावरा यांना माहिती दिली. शासनाकडून तातडीची व भरीव स्वरूपात मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आमदार पावरा यांनी प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईचे प्रस्ताव देण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांचे सांत्वन करताना त्यांनी शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT