dhule municipal commissioner amita dagade patil esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: ‘त्यांनी’ अक्कल शिकवू नये, थेट भिडावे! मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील यांचे आव्हान; दोन जणांना पदोन्नती

Latest Dhule News : ज्यांनी महापालिका खड्ड्य़ात घातली त्यांनी मला अक्कल शिकवू नये, थेट भिडावे, अशा शब्दात संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांनी आव्हान दिले.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : पदोन्नती व आनुषंगिक घडामोडीच्या अनुषंगाने येथील महापालिकेत काही कर्मचाऱ्यांकडून निवेदने, तक्रारी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील संतप्त पाहायला मिळाल्या.

ज्यांनी महापालिका खड्ड्य़ात घातली त्यांनी मला अक्कल शिकवू नये, थेट भिडावे, अशा शब्दात संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांनी आव्हान दिले. ज्यांना पदोन्नती मिळाली आहे, त्यांनी केवळ खुर्च्या उबवू नयेत. पदानुसार कामेही करावीत, असा सल्लाही त्यांनी दिला. (Municipal Commissioner Amita Dagde Patil challenge to complainers)

दरम्यान, मनपा सभेत गुरुवारी (ता. २६) दोन अधिकाऱ्यांना पदोन्नतीचा देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. महापालिकेतील अधीक्षक किशोर सुडके यांना साहाय्यक आयुक्त पदावर पदोन्नती देऊन तसा प्रस्ताव शासनाकडे कार्योत्तर मान्यतेसाठी सादर करण्याचा विषय प्रशासकीय महासभेपुढे होता, तो मंजूर करण्यात आला. तसेच, उपनगरसचिव मनोज वाघ यांना नगरसचिव (प्रशासकीय श्रेणी-१) या पदावर पदोन्नती देणे व वेतनश्रेणी निश्‍चितीबाबतचा विषही सभेपुढे होता. त्यालाही मंजुरी देण्यात आली.

त्यांची कानउघडणी

या पदोन्नतीच्या विषयाच्या अनुषंगाने मनपा आयुक्त तथा प्रशासक दगडे-पाटील यांनी महापालिकेत पदोन्नती, विभागांतर्गत बदल्या, कामांच्या जबाबदाऱ्यांचे वाटप याअनुषंगाने काही कर्मचाऱ्यांकडून होत असलेल्या तक्रारी, निवेदने आदी घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संबंधित कर्मचाऱ्यांची अप्रत्यक्षरीत्या कानउघडणी करत थेट आव्हानच दिले. (latest marathi news)

ज्यांनी म्युनिसिपॅलिटी खड्ड्य़ात घातली, त्यांनी अक्कल शिकवू नये, थेट भिडावे असे आव्हान त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिले. ३०-३० वर्षाची घाण साचली आहे. ठरवले तर त्यांच्या रिकव्हरी लावून टाकेन, असा इशाराही दिला.

फक्त खुर्च्या उबवू नका

आत्तापर्यंत १८० जणांना पदोन्नतीचा लाभ देण्यात आला आहे. पदोन्नती, वेतनश्रेणी केवळ खुर्च्या उबवायला दिलेली नाही. त्यामुळे ज्या पदावर आपण आहोत. त्यानुसार कामेही करा, असा सल्लावजा आदेशही आयुक्त दगडे-पाटील यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT