Dhule Municipal Corporation
Dhule Municipal Corporation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : नवा चेहरा कोण ? नाट्यमय घडामोडीनंतर महापौर निवडीकडे धुळेकरांचे लक्ष

सकाळ वृत्तसेवा

धुळे : डिसेंबरपासून सुरू झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर प्रदीप कर्पे यांनी शनिवारी (ता. ७) भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्याकडे राजीनामा सादर केला.

त्यामुळे या पदाच्या स्पर्धेत असलेल्या नगरसेविका प्रतिभा चौधरी, नगरसेवक हर्षकुमार रेलन, नगरसेविका वालिबेन मंडोरे यांच्यात निवडीसाठी कमालीची चुरस निर्माण झाली आहे.

भाजपचे नेते वर्षभराच्या या पदासाठी कुठल्या नव्या चेहऱ्याला पसंती देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून असेल. (Dhule Municipal Corporation mayor Dhulekar focus on mayor selection Dhule News)

येथील महापालिकेच्या डिसेंबर २०१८ मधील पंचवार्षिक निवडणुकीनंतर महापौरपदासाठी चंद्रकांत सोनार यांना अडीच वर्षांचा कालावधी मिळाला. त्यावेळी सव्वा- सव्वा वर्षांचे चार महापौर देण्याचा निर्णय भाजपस्तरावर घेतला गेला होता. मात्र, श्री. सोनार यांनी अडीच वर्षांचा कालावधी घेतला.

त्यामुळे महापौरपदाचा पुढील अडीच वर्षांचा कालावधी आपल्यालाही मिळू शकेल, असे श्री. कर्पे यांना वाटले. मात्र, त्यांचा सव्वा वर्षांचा कालावधी पूर्ण होताच त्यांचा राजीनामा घेण्याविषयी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्यावर स्थानिक पातळीवरून दबाव वाढू लागला. यानंतर श्री. कर्पे यांनी महापौरपदाचा राजीनामा श्री. अग्रवाल यांच्याकडे शनिवारी सायंकाळी सादर केला. तो सोमवारी (ता. ९) आयुक्त किंवा नगरसचिवांकडे सादर केला जाईल.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

कर्पे यांचा राजीनामा

महापौरपदी कर्पे यांची १७ सप्टेंबर २०२१ ला निवड झाली. नंतर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून न्यायालयीन लढाईमुळे श्री. कर्पे यांनी पदाचा राजीनामा दिला व ते पुन्हा महापौर झाले. यात येथील महापौरपदाच्या आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल होती. या याचिकेचा निकाल १७ मे २०२२ ला लागला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या एक दिवस आधीच १६ मे २०२२ ला श्री. कर्पे यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला. या घडामोडींनंतर महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी घोषित झाले. न्यायालयीन प्रक्रियेमुळे श्री. कर्पे यांना केवळ आठ महिने महापौरपद मिळाले. त्यामुळे त्यांची या पदासाठी जुलै २०२२ मध्ये पुनर्नियुक्ती करत मिळालेल्या कार्यकाळाची भरपाई देण्याचा प्रयत्न झाला. नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये त्यांचा वर्ष- सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यावर त्यांचा राजीनामा घेण्यात आला आहे.

इच्छुकांमध्ये मोठी चुरस

या पार्श्वभूमीवर महापालिकेतील सत्तेच्या शेवटच्या वर्षात भाजपकडून अनुभवी नगरसेवक हर्षकुमार रेलन, ज्येष्ठ नगरसेविका प्रतिभा चौधरी, वालिबेन मंडोरे यांच्यात महापौरपदासाठी कमालीची चुरस आहे. यात प्रभाग चारमधून सौ. चौधरी यांना संधी मिळाल्यास एकाच प्रभागात महापौर व उपमहापौर असतील.

तसेच, महापौरपदासाठी श्री. रेलन यांनीही ताकदपणाला लावली असून श्रीमती मंडोरे याही स्पर्धेत आहेत. सौ. चौधरी यांना अडीच वर्षाच्या कालावधीनंतर, तर श्री. रेलन यांना पहिल्या टप्प्यातील अडीच वर्षांत महापौरपदाची संधी दिली जाईल, असा शब्द पक्षपातळीवरून दिला गेल्याने त्यांच्यातही महापौरपदासाठी चुरस असल्याचे बोलले जाते. पक्षस्तरावरून कुणाच्या गळ्यात माळ टाकली जाते याकडे सर्वांचे लक्ष आहे. महापालिकेची यंदा डिसेंबरमध्ये निवडणूक असेल. यात भाजपचे ५१ नगरसेवक आहेत.

महापालिका अस्तित्वानंतर प्रशासक, महापौर असे :

प्रशासक :

-दिलीप बंड.............. (३०-०६-२००३ ते ३०-१२-२००३)

- महापौर :

- भगवान करनकाळ...... (३०-१२-२००३ ते ०३-११-२००६)

- के. डी. मिस्तरी......... (०४-१२-२००६ ते ३१-१२-२००८)

- मोहन नवले............. (३१-१२-२००८ ते ३०-०६-२०११)

- मंजुळा गावित........... (०१-०७-२०११ ते ३०-१२-२०१३)

- जयश्री अहिरराव........ (३१-१२-२०१३ ते ३०-०६-२०१६)

- कल्पना महाले.......... (०१-०७-२०१६ ते ०१-०१-२०१९)

- चंद्रकांत सोनार.......... (०१-०१-२०१९ ते ३०-०६-२०२१)

- प्रदीप कर्पे................(१७-०९-२०२१ पासून...............

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Maharashtra Day 2024: मराठी गिरा दिसो...!

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

SCROLL FOR NEXT