श्री बालाजी रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रथ उत्सव मार्गाची मंगळवारी पाहणी करताना महापौर प्रदीप कर्पे. शेजारी नगरसेवक हिरामण गवळी, अधिकारी.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule : बालाजी रथोत्सवासाठी मनपा तयारीत; खड्डे बुजविण्याचे यंत्रणेला निर्देश

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शुद्ध आश्विन एकादशी निमित्त शहरात श्री बालाजी भगवान रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रथ उत्सव मार्गांची महापौर प्रदीप कर्पे यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली. खड्डे बुजविण्यासह आवश्‍यक कामांबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. (dhule municipal corporation preparation for Balaji Rathotsava dhule latest news)

धुळे शहरात सुमारे १२५ वर्षापासून श्री बालाजी भगवान रथोत्सवाची परंपरा आहे. हा रथोत्सवाच्या दर्शनासाठी पंचक्रोशीतून भाविक शहरात येतात. या पार्श्वभूमीवर रथोत्सवाच्या काळात कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नये यासाठी रथाच्या मार्गांची पाहणी महापौर श्री. कर्पे यांनी केली.

रथोत्सव मार्गावरील खड्डे बुजविणे, विद्युत व्यवस्था, आवश्यक त्या ठिकाणी प्रखर झोताचे विद्युत दिवे लावणे, मार्गावरील व चौकातील सार्वजनिक स्वच्छता, मार्गावरील वृक्षांचा विस्तार कमी करणे, वैद्यकीय पथक, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी विविध कामांबाबत त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

नगरसेवक हिरामण गवळी, भिकन वराडे, संजय वराडे, अभियंता कैलास शिंदे, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत उगले, वृक्ष अधिकारी रवीकिरण पाटकरी, अग्निशमन विभाग, विद्युत विभागाचे कर्मचारी, बालाजी रथ उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Forecast In Maharashtra : पर्जन्यमानात सुधारणा! महाराष्ट्रात पावसाला वेग येणार; २३ जूननंतर राज्यभर सर्वदूर पाऊस, IMD चा अंदाज

Reliance Success Story: फुटबॉल मैदानावरील बैठक अन् बदललं अंबानींचं नशीब! कसं उभं राहिलं रिलायन्सचं 18 लाख कोटींचं साम्राज्य?

Latest Marathi Live Updates: सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र एकीकरण समितीला कर्नाटकात अडवले, ठिय्या आंदोलन

मृत डॉ. शिरीष वळसंगकरांच्या घरातील भांडण पोलिस ठाण्यात! रुग्णालयावरील घरात राहण्यावरून डॉक्टरांचे जावई अन्‌ सून डॉ. शोनाली यांच्यात वाद; सदर बझार पोलिसांत तक्रारी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २० जून २०२६ ते २६ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT