Ahirani Sahitya Sammelan  esakal
उत्तर महाराष्ट्र

Ahirani Sahitya Sammelan : नेरला उद्या अहिराणी साहित्य संमेलन; राज्यातील साहित्यप्रेमींची उपस्थिती

Dhule : खानदेश साहित्य संघ, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे नेर (ता. धुळे) येथे रविवारी (ता. २५) सातवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : खानदेश साहित्य संघ, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे नेर (ता. धुळे) येथे रविवारी (ता. २५) सातवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन होणार आहे. यात अहिराणी साहित्यिकांकडून माय अहिराणीचा जागर केला जाणार आहे. आदर्श सरपंच भास्करराव पेरे- पाटील यांच्या हस्ते उद्घघाटन होईल.

अहिराणी साहित्य आणि साहित्यिकांना व्यासपीठ मिळण्यासाठी एकदिवसीय साहित्य संमेलन होत आहे. नेर येथे स्वातंत्र्यसेनानी स्व. अण्णासाहेब चुडामण पाटील साहित्य नगरीत (बालाजी लॉन) होणाऱ्या संमेलनात ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक डॉ. सुधीर देवरे (सटाणा) अध्यक्षस्थानी असतील. (Ner Ahirani Sahitya Sammelan From tomorrow)

धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील स्वागताध्यक्ष आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत सासणे, राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य डॉ. पुष्पराज गावंडे, डॉ. धनंजय गुडसरकर, साहित्यिका मिनाक्षी पाटील, सहावे अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रमेश बोरसे प्रमुख पाहुणे असतील. साहित्य, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असेल.

साहित्य संमेलनात सकाळी साडेआठला ग्रंथदिंडी, सकाळी दहाला उद्‌घाटन, दुपारी बाराला साहित्यिक फुला बागूल यांच्या अध्यक्षतेत भाषा साहित्य संस्कृतीनी चावय या विषयावर चर्चासत्र, दुपारी दीडला डॉ. एस. के. पाटील यांच्या अध्यक्षतेत कथाकथन, नंतर शिरपूर येथील प्रवीण माळी यांचे आयत पोयत सख्यानं हा कार्यक्रम.

दुपारी दोनला ते सायंकाळी साडेसहापर्यंत विविध सत्रात कवी प्रकाश पाटील पिंगळवाडेकर, रावसाहेब कुंवर, प्राचार्या रत्ना पाटील, प्राचार्य अशोक शिंदे यांच्या अध्यक्षतेत कवी संमेलन होईल. नंतर साहित्य संमेलनाचा समारोप होणार आहे.

विश्राम बिरारी अध्यक्षस्थानी असतील. सिनेगीतकार प्रशांत मोरे प्रमुख पाहुणे असतील. खानदेशवासियांना उपस्थितीचे आवाहन आयोजक तथा खानदेश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. सदाशिव सूर्यवंशी, सचिव कवी रमेश बोरसे, प्राचार्या रत्ना पाटील, रमेश राठोड आदींनी केले.

विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील, कवी जगदीश देवपूरकर, रमेश बोरसे, सुभाष अहिरे, प्राचार्या रत्ना पाटील, प्रा.रमेश राठोड, प्रा. अशोक शिंदे, शाहीर नानाभाऊ पाटील, गोकूळ पाटील, शरद धनगर, डॉ. नरेंद्र खैरनार, डॉ. कुणाल पवार, हेमलता पाटील, चुडामण पाटील, विजय पाटील, देवदत्त बोरसे, जितेंद्र चौधरी.

प्रवीण देवरे, सुनीता बोरसे, जितेंद्र बहारे, सुनीता पाटील, के. बी. लोहार, शाहीर श्रावण वाणी, वीरेंद्र बेडसे, डॉ. भय्या पाटील, बाळासाहेब गिरी, दिनेश चव्हाण, गणेश पाटील आदी संयोजन करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT