Students performing Lezim dance on occasion of Shiv Jayanti. esakal
उत्तर महाराष्ट्र

Shiv Jayanti 2024 : ‘कूळवाडीभूषण छत्रपतीं’ना रयतेचा मुजरा! धुळे शहरासह जिल्ह्यात जल्लोषात शिवजयंती

Shiv Jayanti : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, कूळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती धुळे शहरासह जिल्ह्यात सोमवारी (ता. १९) जल्लोषात साजरी झाली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, कूळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती धुळे शहरासह जिल्ह्यात सोमवारी (ता. १९) जल्लोषात साजरी झाली. सकाळपासूनच शहरातील छत्रपतींच्या पुतळ्यांना माल्यार्पणासह अभिवादनासाठी मान्यवर आणि शिवप्रेमींची रीघ लागली.

विविध पक्ष-संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. (Dhule birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj of was celebrated)

चौकाचौकांत अभिवादन कार्यक्रमांच्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचे पोवाड्यांनी परिसर दुमदुमून गेले. शोभायात्रा, बाईक रॅलीसह इतर विविध कार्यक्रमांचीही रेलचेल पाहायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आमदार फारुक शाह यांनी मनोहर थिएटरजवळील पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचा राजकीय व्यवहार, अर्थनीती, शेती धोरण याची नितांत गरज असल्याचे आमदार शाह म्हणाले. डॉ. दीपश्री नाईक, डॉ. बापूराव पवार, आसिफ शाह, नीलेश काटे उपस्थित होते.

धुळे जिल्हा परिषद

जिल्हा परिषदेत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे, कृषी व पशुसंवर्धन, दुग्धविकास समिती सभापती हर्षवर्धन दहिते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, प्रकल्प संचालक बी. ए. बोटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, बांधकामचे कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, कार्यकारी अभियंता ए. सी. पाटील आदी उपस्थित होते.

शहरात बाईक रॅली

शिव जयंतीनिमित्त शहरात सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठी आंबेडकरी अनुयायांनी बाईक रॅली काढल्याचे किरण गायकवाड यांनी सांगितले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून बाईक रॅलीस प्रारंभ झाला. चौकाचौकांतून रॅली निघाली. प्रत्येक चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप झाला.

प्रा. निकम इन्स्टिट्यूट

गोंदूर (ता. धुळे) येथील ओंकार बहुद्देशीय विकास संस्थेच्या प्रा. रवींद्र निकम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सतर्फे छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रवींद्र निकम अध्यक्षस्थानी होते.

अध्यक्ष प्रा. निकम यांनी घराघरांतून शिवचरित्र अभ्यासून त्यातील विचार अंगीकारावे, असे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी पोवाडा व पारंपरिक लेझीम नृत्य सादर केले. छत्रपतींच्या नामजयघोषाने परिसर दणाणला. संस्थेच्या सचिव प्रा. शुभांगी निकम व प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

समाजकार्य महाविद्यालय

मोराणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे छत्रपती शिवरायांना अभिवादनाचा कार्यक्रम झाला. प्राचार्य डॉ. विष्णू गुंजाळ अध्यक्षस्थानी होते. प्रा. डॉ. गोपाळ निंबाळकर यांनी छत्रपती शिवरायांचे रयतेबाबतचे धोरण, महिलांविषयी संवेदनशीलता, युद्धनीती, सर्वधर्म समभाव, आदर्श प्रशासन आदी विविध पैलूंवर प्रकाश टाकला. प्रा. डॉ. निंबाळकर यांनी प्रास्ताविक केले.

पाटील महाविद्यालय

ॲड. झुलाल भिलाजीराव पाटील महाविद्यालयात छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्राचार्य डॉ. पी. एच. पवार, उपप्राचार्य प्रा. व्ही. एस. पवार, डॉ. डी. के. पाटील, डॉ. वर्षा पाटील, उपप्राचार्य प्रा. प्रीतम चौक, विद्यार्थी, प्राध्यापक उपस्थित होते. इतिहास विभागातर्फे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या व छत्रपतींच्या जीवनकार्याचे विशेष महत्त्व दर्शविणाऱ्या भित्तिपत्रकांचे अनावरण झाले.

इतिहास विभागप्रमुख डॉ. अमोल पाटील, प्रा. उदय पाटील, प्रा. भाग्यश्री पाटील आदी उपस्थित होते. प्रतिमापूजन समिती संयोजिका प्रा. डॉ. योगिता पाटील, एनसीसीप्रमुख प्रा. पूनम देवरे, डॉ. मोरेश्वर नेरकर, प्रा. श्रीकांत वाघ, प्रा. सोहन साळुंखे, विद्यार्थिनी सुमित्रा वसावे, श्रुती कानडे, सखाराम बेलदार, अशोक बागूल उपस्थित होते.

विद्याधन महाविद्यालय

वलवाडी येथील विद्याधन महाविद्यालयात छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. प्राचार्य डॉ. के. बी. पाटील यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला. संस्थेच्या अध्यक्षा शारदा पाटील यांनी शिवरायांच्या युद्धकौशल्याची माहिती दिली. प्राचार्य डॉ. आर. बी. पवार, प्रा. हिरनाक्षी पवार, विद्यार्थिनी प्राजक्ता अहिरराव यांनी मनोगत व्यक्त केले.

संस्थेचे सचिव हर्शल पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. योगेश बोरसे, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. जागृती पाटील, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. ललिता निकम, प्रा. गौरी खैरनार, प्रा. भूषण पाटील, प्रा. प्रियंका सूर्यवंशी, प्रा. गायत्री नवसार, प्रा. वसुधा अहिरे, प्रा, हिरनाक्षी पवार, प्रा, अंजली माळी, प्रा, जागृती पाटील आदी उपस्थित होते. श्यामकांत चव्हाण, उत्कर्षा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

सिसोदे महाविद्यालय

नरडाणा (ता. शिंदखेडा) येथील भाऊसाहेब एम. डी. सिसोदे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागातर्फे छत्रपती शिवरायांना अभिवादनासह महाविद्यालयापासून ग्रामपंचायतपर्यंत सवाद्य सजीव देखाव्याची शोभायात्रा काढण्यात आली. संस्थेचे अध्यक्ष संजयकुमार सिसोदे, प्राचार्य डॉ. पी. एस. गिरासे, उपप्राचार्य डॉ. यू. जी. पाटील, उपप्राचार्य डॉ. एन. के. पाटील, उपप्राचार्य प्रा. एस. टी. भामरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिंदेंची शिवसेना घेणार बीएमसीच्या महापौरपदाची धुरा! भाजपसोबत दीड वर्षांचा फॉर्म्युला ठरला; सत्तेचे समीकरण बदलले

SL vs ZIM, T20 WC: झिम्बाब्वेचा आणखी एक दे धक्का! ऑस्ट्रेलियानंतर यजमान श्रीलंकेला नमवले; टीम इंडियाला आव्हान दिले

Video: चंद्रभागा नदीपात्रात शिवरायांचा तरंगता देखावा; सोशल मीडियात व्हिडीओ व्हायरल

पहिलाच सिनेमा हिट मग इंडस्ट्रीतून गायब; आता रितेशच्या 'राजा शिवाजी'मध्ये साकारणार जिजाऊंची भूमिका; कोण आहे ही अभिनेत्री?

Pune Crime : सायबर टोळीकडून ज्येष्ठांना लक्ष्य, ‘ऑनलाइन टास्क’पासून ‘मनी लॉन्ड्रिंग’पर्यंत नवे डाव; तीन प्रकरणांत साडेतीन कोटींची लूट

SCROLL FOR NEXT