Dhule Shrikant Dhiware present during examination at Jijamata school for 12th examination. esakal
उत्तर महाराष्ट्र

HSC Exam 2024 : बारावीच्या परीक्षेला सुरवात; पोलिस अधीक्षक धिवरे यांची विविध केंद्रांना भेट

HSC Exam 2024 : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवार (ता. २१)पासून बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बुधवार (ता. २१)पासून बारावीच्या परीक्षेला सुरवात झाली. इंग्रजीचा पहिला पेपर सुरळीत पार पडला. परीक्षार्थींना दहा मिनिटे जास्ती वेळ मिळाला. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शहरातील तीन परीक्षा केद्रांना भेटी देत पाहणी केली.

जिल्ह्यातील ४६ केंद्रांमध्ये २४ हजार ३०९ विद्यार्थी प्रविष्ट आहेत. बारावीच्या पहिल्या इंग्रजीच्या पेपरला सकाळी अकराला सुरवात झाली. (Dhule Commencement of 12th Exams)

परीक्षा केंद्रांना भरारी पथकांनी भेट देत पाहणी केली. काही संवेदनशील केंद्रांवर पथक ठाण मांडून होते. पोलिस अधीक्षक धिवरे यांनी नॅशनल ऊर्दू हायस्कूल, अभय उच्च माध्यमिक शाळा आणि जिजामाता उच्च माध्यमिक शाळा परीक्षा केंद्राला भेट दिली.

काही केंद्र परिसरात कॉपीचा खच दिसून आला. जिल्ह्यात ११ केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. या केंद्रांवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पाच भरारी पथके तसेच पोलिस बंदोबस्त तैनात आहे.

विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले. काही केंद्रांवर परीक्षार्थींना गुलाबपुष्प देत त्यांचा शिवसेना युवा सेनेचे जिल्हाप्रमुख हरीश माळी, युवती सेना विस्तारक सोनी सोनार, महानगरप्रमुख मनोज जाधव, शहरसंघटक जयेश फुलपगारे, शुभम फुलपगारे यांनी हुरूप वाढविला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB Win IPL 2026 Final: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 'जेतेपद' राखले! असा पराक्रम करणारा तिसरा संघ, विराट कोहलीची Fastest Fifty

विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर; प्राजक्त तनपुरेंनाही संधी, राजकीय चर्चांना उधाण

Dhananjay Deshmukh: बंदुकीचा धाक दाखवल्याचा आरोप 'फुसका बार'; सीसीटीव्हीने उघड केला दोन्ही बाजूंचा बनाव

Suman Kalyanpur: भारतीय संगीतविश्वातील सुवर्णपान हरपले! ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; संगीतविश्व शोकमग्न

IPL 2026 Final, RCB vs GT live: गतविजेत्या बंगळुरूने इतिहास रचला! मुंबई इंडियन्सचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, बनला पहिला संघ...

SCROLL FOR NEXT