Dhule After a successful protest in wine shop case, on Tuesday Distribute notebooks, pens to students
Dhule After a successful protest in wine shop case, on Tuesday Distribute notebooks, pens to students esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : वादग्रस्त वाइन शॉप अखेर हटविले!

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील शहर पोलिस ठाणे परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यामागे वाइन शॉप होते. ते पुतळा परिसरातून हटविण्यासाठी अनेकांनी आंदोलने केली आणि नंतर ती विस्मरणात गेली.

परंतु, आझाद समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी पुतळ्यामागील वाइन शॉप हटविण्यासाठी तीव्र आंदोलन केले. त्यानंतर वादग्रस्त वाइन शॉप हटविण्याचा निर्णय झाल्याने या पक्षातर्फे मंगळवारी (ता. २०) पुतळ्याजवळ अनोख्या पद्धतीने आनंदोत्सव साजरा झाला.

डिजे, ढोल-ताशांच्या गजरात आंदोलनाचे यश साजरे करण्याऐवजी प्रदेशाध्यक्ष लोंढे यांनी सहकाऱ्यांसह गरजू विद्यार्थ्यांना वह्या, पेनचे वाटप करीत बांधिलकीची प्रचीती दिली. अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, शहराचे पोलिस निरीक्षक धीरज महाजन उपस्थित होते.

बहुचर्चित वाइन शॉप हटविण्याच्या निर्णयानंतर आझाद समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांसह प्रदेशाध्यक्ष लोंढे व समर्थक डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ जमले. त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. वाइन शॉप स्थलांतरित होत नाही तोपर्यंत ते बंद ठेवावे, असा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

वाइन शॉप हटावसाठी अनेक वेळा आंबेडकरी विचारधारेच्या विविध पक्ष-संघटनांनी आंदोलने केली. आझाद समाज पक्षातर्फे महिन्यापासून निवेदने, मोर्चा, चक्काजाम, ठिय्या आंदोलन आणि बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला गेला. प्रशासनावर दबावतंत्र अवलंबिले गेले.

डॉ. आंबेडकर पुतळ्यामागे वाइन शॉप ही संकल्पनाच समर्थनीय नाही, असा प्रदेशाध्यक्ष लोंढे यांचा युक्तिवाद होता. आमदार फारुक शाह यांनी राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभुराजे देसाई यांच्या पटलावर हा प्रश्‍न नेला. त्यातून संयुक्त बैठक झाली. नंतर आमदार शाह यांच्या हस्ते आंदोलन स्थगित करण्यात आले.

जिल्हा प्रशासनाच्या निर्णयानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास गुलाब जलाचा अभिषेक झाला. तो स्वच्छ करण्यात आला. दोनशे गरजू विद्यार्थ्यांना वही, पेन वाटप झाले.

वाइन शॉप हटविण्याच्या निर्णयात सहकार्य करणारे महसूल, पोलिस, उत्पादन शुल्क विभागासह मंत्री, आमदार शाह, आंदोलकांचे आभार प्रदेशाध्यक्ष लोंढे यांनी मानले. आंबेडकरी विचारांचा विजय असल्याचे ते म्हणाले.

जितेंद्र शिरसाट, शहबाज शाह, आनंद सैंदाणे, मुकुंद शिरसाट, मुकेश खरात, बॉबी वाघ, संजय अहिरे, निशांत मोरे, देवीदास जगताप, कल्याण गरुड, महेंद्र शिरसाट, राज चव्हाण, दिलीप भामरे, पप्पू सहानी, मनी खैरनार, ज्ञानेश्वर भामरे.

चंद्रकांत सत्तेसा, रंजना इंगळे, सिद्धार्थ जगदेव, नासिर पठाण, इक्बाल शहा, आसिफ शहा, अफसर शहा, अ‍ॅड. शीतल जावरे, रवी कढरे, रमाकांत खंडारे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT