Agriculture Sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शेत जमीनी मोजण्यांपासून वंचित 7 गावांची मोजणी होणार

सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे : शिंदखेडा तालुक्यातील निमगूळ, कुरुकवाडे, रामी, तावखेडा (प्र.नंदुरबार), टाकरखेडा, वडदे व चावडदे या गावांना सुमारे ५० वर्षांपूर्वी एकत्रीकरण योजना लागू असल्याचे अभिलेखात दिसून येते. त्यानुसार शेत जमिनीची मोजणी एकत्रीकरण योजनेनुसार ७/१२ सादर करण्याचे आवाहन शिंदखेडा भूमिअभिलेख विभागाचे उपअधीक्षक दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.

‘सकाळ’ ने शेतजमीन मोजणीपासून सात गावे वंचित या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर महसूल व भूमिअभिलेख विभागाने गतीने हालचाली सुरू केल्या आहे.

शिंदखेडा तालुक्यातील सात गावांना एकत्रीकरण योजना लागू होऊनही अद्यापही ही योजना लागू झालेली नव्हती. सुमारे पाच दशके योजना लागू होऊनही ७/१२ उताऱ्यावर अंमलबजावणी का झाली नाही याबाबत माहिती उपलब्ध नव्हती. या गावातील सर्वे क्रमांक व गट क्रमांक उताऱ्यातील क्षेत्रात तफावत असून नकाशे मंजूर योजनेशी भिन्नता असल्याचे आढळले. तफावतीमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींच्या सामना करावा लागत होता.

शिंदखेडा तालुक्यांत १४३ गावे असून या सर्व गावांत ७/१२ उतारा वापरला जातो. तालुक्यातील १४० गावांना एकत्रीकरण योजना लागू होती. मात्र त्या सात गावे अद्यापही वंचित होते. तालुक्यातील निमगूळ, कुरुकवाडे, रामी, तावखेडा (प्र.नंदुरबार), टाकरखेडा, वडदे व चावडदे या सात गावांना एकत्रीकरण योजना लागू होऊनही अद्यापही एकत्रीकरण योजनेचा अंमल तलाठींनी ७/१२ उताऱ्यावर घेतलेला नव्हता.

हेही वाचा: असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

दरम्यान, यामुळे विकास आराखड्यावर परिणाम होऊ शकेल. तरी एकत्रीकरण योजनेनुसार ७/१२ उताऱ्या अंमल होणे उचित ठरेल असा अभिप्राय शिंदखेडा उप अधीक्षक भूमिअभिलेख दत्तात्रय वाघ यांनी जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले होते.

गावात तलाठी यांच्याकडे सर्व्हे क्रमांक क्षेत्र दर्शविणारे ७/१२ अमलात असल्याने गटाचे ७/१२ उपलब्ध होत नसल्यामुळे मोजणी प्रकरणात सर्व्हे क्रमांक निहाय उपलब्ध ७/१२ नुसार मोजणीचे अर्जाबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने उपलब्ध ७/१२ नुसार मोजणीचे अर्ज स्वीकारण्याचे आदेश वरिष्ठ स्तरावरुन प्राप्त झाले आहे. या गावासंबंधीचे मोजणी अर्ज नियमानुसार ७/१२ व शुल्कासह करता येणार आहे. अशी माहिती शिंदखेडा भूमिअभिलेख उपअधीकक्ष दत्तात्रय वाघ यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT