stray dog esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कुत्रे निर्बिजीकरणासाठी जागांची पाहणी

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी तीन जागांची पाहणी करण्यात आली. यात महापालिकेने दोन जागा दाखविल्या तर कंत्राटदार संस्थेने एका खासगी जागेची पाहणी केली आहे. या तीन जागांपैकी एक जागा एक-दोन दिवसात अंतिम होणार आहे.

शहरातील मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी महापालिकेने जयपूर येथील संतुलन जीवकल्याण संस्थेला काम दिले आहे. संस्थेला महापालिकेने कार्यादेश दिल्यानंतर करारनाम्याची प्रक्रिया झाली. दरम्यान, आता कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी जागा निश्‍चितीचे काम सुरु आहे.

यासाठी महापालिकेतर्फे आरोग्य विभागाचे कार्यालय अधीक्षक राजेंद्र माईणकर यांनी संतुलन जीवकल्याण संस्थेचे धीरज नेहरा यांना महापालिकेच्या दोन जागा दाखविल्या. स्वच्छता निरिक्षक विकास साळवे, महेंद्र ठाकरे, गजानन चौधरी, विजय गोसावी आदी उपस्थित होते. महापालिकेतर्फे डेडरगाव येथील पाण्याच्या टाकीजवळ तसेच, वरखेडी रोडवरील एफएसटीपी जवळील परीसरातील जागा दाखविल्या.

या ठिकाणी मनपा मालकीची रूम उपलब्ध आहे. दरम्यान, महापालिकेने दाखविलेल्या दोन जागांव्यतिरिक्त कंत्राटदार संस्थेने आपल्या स्तरावर एका खासगी जागेचीही पाहणी केली आहे. पाहणी केलेल्या तीनपैकी एक जागा येत्या एक-दोन दिवसात कंत्राटदार संस्थेकडून अंतिम होऊन लवकरात लवकर प्रत्यक्ष काम सुरु होईल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT