Children esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : अनाथ बालकांना मिळणार आधार; लाभासाठी पैशांची मागणी करणाऱ्या व्यक्तीची पोलिसांत तक्रार करावी

सकाळ वृत्तसेवा

धुळे : महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडून ० ते १८ वर्षे वयोगटातील अनाथ, निराधार, निराश्रित बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात येतो.

पात्र लाभार्थ्यांच्या पालकांनी अर्ज दाखल करताना कोणत्याही मध्यस्थाने पैशांची मागणी केल्यास अशा व्यक्तीबद्दल तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांनी केले आहे.

बाल संगोपन योजनेच्या लाभ अनाथ किंवा ज्याच्या पालकांचा पत्ता लागत नाही. जी दत्तक देणे शक्य होत नाही अशी बालके. एक पालक असलेली व कौटुंबिक संकटात असलेली बालके, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे, आदी कारणांमुळे विघटित झालेल्या, एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके, कुष्ठरुग्ण व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, एचआयव्ही ग्रस्त/बाधित बालके, तीव्र गतिमंद बालके दोन्ही पालक दिव्यांग आहेत अशी बालके.

पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव, अति हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन किंवा पोलिस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीतील बालके, शाळेत न जाणारे बाल कामगार, (कामगार विभागाने सुटका व प्रमाणित केलेले) जे ० ते १८ वयोगटातील सर्व बालकांना बाल कल्याण समितीच्या मंजुरीने लाभ देण्यात येतो.

या योजनेंतर्गत लाभासाठी कार्यालयाकडून कुठलीही फी अथवा रक्कम आकारली जात नाही. ही योजना पूर्णपणे शासकीय योजना असून बालकांच्या काळजी व संरक्षणाच्या हितसंबंधी असल्याचेही श्री. शिंदे यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT