उत्तर महाराष्ट्र

निजामपूरला फिरत्या नारळाच्या कार्यक्रमातून समाजप्रबोधन...

प्रा. भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे) : माळमाथा परिसरातील निजामपूर (ता. साक्री) येथे सुमारे 47/48 वर्षानंतर प्रथमच रविवारी (ता. 10) फिरत्या नारळाचा कार्यक्रम होत असून, 8 डिसेंबरपासून सलग तीन दिवस कार्यक्रमांची रेलचेल आहे. ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप बारामतीकर यांचे जाहीर कीर्तन हे आकर्षणाचे केंद्रबिंदू असून 'भक्त पुंडलिक' हे नाटक, प्रवचन, हरिपाठ, गीतापाठ, माऊलींच्या पादुकांची रथ मिरवणूक, निवृत्तीनाथ महाराज पदयात्रा, महाप्रसाद आदींचा त्यात समावेश आहे. वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान परमपूज्य जोग महाराज, मामासाहेब दांडेकर, हभप. कृष्णाजी गुरुजी यांच्या आशीर्वादाने प्रेरित अशा या कार्यक्रमास हभप. यशोदा अक्का यांची प्रमुख उपस्थिती आहे.

शुक्रवारी (ता. 8) रात्री मुंबई येथील वीरभद्र कलापथकाने 'भक्त पुंडलिक' हे नाटक सादर केले. शनिवारी (ता. 9) रोजी रात्री नऊ ते अकरादरम्यान ह.भ.प. मच्छिंद्र महाराज (वाडीभोकर) यांचे जाहीर कीर्तन होईल. 10 तारखेला दुपारी दोन ते चार माऊलींच्या पादुकांची रथ मिरवणूक, दुपारी दोनपासून अविरत महाप्रसाद, दुपारी साडेतीन ते साडेचार हभप. विश्वनाथ महाराज (तळवाडे) यांचे प्रवचन, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व गीतापाठ, सायंकाळी सात ते आठ संगीत भजन, रात्री आठ ते साडेआठ निवृत्तीनाथ महाराज पदयात्रा नियोजन, रात्री साडेआठ ते अकरा ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप (बारामती) यांचे जाहीर कीर्तन होईल. "या फिरत्या नारळाच्या कार्यक्रमासाठी अन्नपूर्णा समिती, पार्किंग समिती, पाणी व्यवस्थापन समिती, निधी संकलन समिती, सल्लागार समिती अशा एकूण पाच समित्या गठीत करण्यात आल्या असून खान्देशासह राज्यातील सुमारे पन्नास हजार भाविक या फिरत्या नारळाच्या कार्यक्रमाला हजेरी लावतील," अशी प्रतिक्रिया ग्रामस्थ, भजनी मंडळ व संयोजकांतर्फे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाणी यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. समस्त ग्रामस्थ व भजनी मंडळाने उपस्थितीचे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT