Death News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कर्ज वाढल्याने तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे : जखाणे (ता. शिंदखेडा) येथील तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकीमुळे कर्जाचा डोंगर व त्यात राष्ट्रीयीकृत बँकेचे पीक कर्ज व सावकारी कर्ज वाढल्याने गळफास घेऊन शुक्रवारी (ता.२३) दुपारी आत्महत्या केली.

नारायणसिंह लोटनसिंह गिरासे (वय ४०) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. नारायणसिंह गिरासे आई, पत्नी व मुलांसह राहत होते. त्यांची पत्नी शेतात गेली होती व मुलगा कुणाल परीक्षेसाठी महाविद्यालयात व मुलगीही महाविद्यालयात गेली होती.

मुलगी शिंदखेडा महाविद्यालयातून घरी आल्यावर नारायणसिंह (वडील) गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. मुलीने आरडाओरड केल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत पोलिसपाटील ज्योती आव्हाड यांनी चिमठाणे पोलिसांत माहिती दिली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद झाली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: ‘तुम्हाला तर स्वातंत्र्य २३ एप्रिल २०१४ ला मिळाली ना?’; कंगनाच्या पोस्टवर नेटकऱ्यांचा संताप, व्हिडिओ पाहा...

Mumbai Accident: इस्टर्न फ्रीवेवर मस्ती नडली, एकाचा मृत्यू दोघे गंभीर; दुचाकी अपघाताचा भीषण VIDEO

Maharashtra Companies : 6 लाखांवरून थेट 21 लाखांवर! मोदी सरकारच्या काळात कंपन्यांची संख्या कशी वाढली? उदय सामंतांचा मविआला सवाल, 'फेक नॅरेटिव्ह'वरुनही पलटवार

Marathi News Live Updates : मोहन भागवतांचा तरुणांना रोजगाराबाबत महत्त्वाचा संदेश

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

SCROLL FOR NEXT