Zilla Parishad CEO Shubham Gupta launching Save Mom portal to reduce maternal, neonatal mortality.
Zilla Parishad CEO Shubham Gupta launching Save Mom portal to reduce maternal, neonatal mortality. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळे जिल्ह्यात आता ‘सेव्ह मॉम’ प्रयोग

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जिल्ह्यातील गरोदर माता मृत्यूदर आणि नवजात शिशू मृत्यूदर कमी करण्यासाठी धुळे जिल्हा परिषदेने ‘सेव्ह मॉम’ हा नावीन्यपूर्ण प्रयोग हाती घेतला आहे. या प्रयोगासाठी जिल्ह्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविला जाणारा असून टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्ह्यात त्याचा विस्तार करण्यात येईल अशी माहिती धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांनी दिली. (Dhule Zilla Parishad launched Save Mom experiment to reduce maternal mortality and neonatal mortality)

ग्रामीण भागात विविध कारणांनी गरोदर माता व नवजात शिशू मृत्यूचे प्रकार घडतात. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी धुळे जिल्हा परिषदेने १५ फेब्रुवारी २०२४ पासून ‘सेव्ह मॉम’ नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांच्या संकल्पनेतून हा प्रयोग राबविण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन बोडके, मुख्यमंत्री फेलो सुजित सावंत, साथरोग वैद्यकीय अधिकारी संजय मोरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी किशोर पगारे, प्रफुल्ल चव्हाण हे जिल्हा स्तरावरून या उपक्रमाचे संनियंत्रण करीत आहेत.

चार पीएचसींची निवड

या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात साक्री तालुक्यातील कुडाशी, दहिवेल व शिरपूर तालुक्यातील बोराडी, रोहिणी या चार प्राथमिक आरोग्य उपचार केंद्रांचा समावेश केला आहे. माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून नियोजित गावातील जननक्षम जोडपी आणि अतिजोखीम असलेल्या गरोदर स्त्रियांची नोंदणी ‘सेव्ह मॉम’ या पोर्टलवर केली जात आहे.

एकदा या पोर्टलवर नोंदणी झाल्यानंतर अतिजोखीम गटातील गरोदर मातांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवा पुरविणे, पोषण आहाराबाबत काळजी घेणे, वेळच्यावेळी आवश्यक तपासण्या करून घेणे, समुपदेशन आणि सुरक्षित प्रसूती आदी बाबींसाठी नियमित पाठपुरावा केला जाणार आहे.

यंत्रणेला प्रशिक्षण

यासाठी विकसित केलेल्या तंत्रप्रणालीचे प्रशिक्षण तालुका स्तरावरील आरोग्य विभागातील संबंधित यंत्रणा, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व संबंधित यंत्रणा यांना दिलेले आहे. गरोदर मातांची नोंदणी झाल्यापासून जन्माला आलेले बाळ तीन वर्षांचे होईपर्यंत या सोयी सुविधा पुरविणार आहे. तसेच आवश्यक समुपदेशनही केले जाणार आहे.

गरोदर मातांचा मृत्यू दर कमी करणे आणि नवजात शिशू मृत्यू दर कमी करणे हा त्यामागील उद्देश आहे. पहिल्या टप्प्यात चार प्राथमिक आरोग्य केंद्रांचा समावेश केला असून टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात हा प्रयोग राबविण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT