Primary Health Center Building. In the second photo, the dilapidated sign of the primary health center. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : निमगूळ प्राथमिक आरोग्य केंद्र ‘आजारी’; वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता

Dhule News : निमगूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला १९ गावे जोडली असून, पाच उपकेंद्रे जोडली आहेत.

सकाळ वृत्तसेवा

निमगूळ : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला १९ गावे जोडली असून, पाच उपकेंद्रे जोडली आहेत. मात्र या ठिकाणी तीन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर असून, एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर जबाबदारी असल्याने त्यांच्या कामानिमित्त ते रजेवर गेल्यास अथवा काही कारणास्तव उशीर झाल्यास तोपर्यंत रुग्णांना थांबावे लागते अशी स्थिती आहे. (Dhule Nimgul Primary Health Center Shortage of Medical Officers)

त्यामुळे या आरोग्य केंद्राची अवस्था स्वतःच आजारी पडल्यासारखी झाली आहे. येथे कर्मचारी भरती करून सुविधा पुवाव्यात, अशी मागणी होत आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ११ पदे रिक्त असून, कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने एकेकाळी जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था वाईट झाल्याने पाहिजे तशी रुग्णसेवा मिळत नसल्याने रुग्णांनी पाठ फिरविली आहे.

ओपीडीत बाह्यरुग्णांची संख्या कमी झाली आहे. वैद्यकीय अधिकारी नसल्याने उर्वरित कर्मचाऱ्यांना बंधन राहिले नाही. कर्मचारी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून भेट दिली नसल्याचे चित्र आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे.

या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी वेळेवर येत नसल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत असून, सर्वसामान्य जनतेतून नाराजी व्यक्त केली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधनिर्माण अधिकारी आहे. त्यांनाही इतरत्र भार दिल्याने या ठिकाणी रुग्णांना औषधे ज्यांना त्याविषयी काहीच माहिती नाही ते औषधवाटप करत असतात. (latest marathi news)

यात चुकीचा औषधोपचार झाल्यास कोण जबाबदार राहील, असा प्रश्न विचारला जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र महामार्ग क्रमांक सहावर लगत असून, अपघात घडत असतात. मात्र त्यांना निवासी वैद्यकीय अधिकारी नसल्याने वेळेवर उपचारासाठी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात घेऊन जावे लागते. तिथेही अशीच परिस्थिती आहे.

ते फक्त प्राथमिक उपचार करतात. त्या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे, म्हणून ते धुळे जिल्हा रुग्णालयात पाठवितात. अपघात झालेल्या रुग्णावर वेळेवर उपचार होणार नसेल तर रुग्णाचे प्रकृती गंभीर होते. रुग्ण दगावण्याची शक्यता असते म्हणून वरिष्ठांनी याची दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे

या केंद्रात दोन कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी द्यावेत, तसेच रिक्त पदांची तातडीने नियुक्ती व्हावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सक्षम वैद्यकीय अधिकारी नसल्याने कर्मचारी वर्ग वेळेवर येत नाही. त्यांच्यावर वैद्यकीय अधिकारी कमी असल्याने कुणावर प्रभाव पडत नाही.

या ठिकाणी कायमस्वरूपी दोन निवासी वैद्यकीय अधिकारी असणे काळाची गरज असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे. वेळोवेळी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्यावी व माहिती घ्यावी तसेच कर्मचारी वर्गाला समाज द्यावी, अशी मागणी होत आहे.

निमगूळ प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती

पदाचे नाव मंजूरपद भरलेली पद रिक्त पदे

वैद्यकीय अधिकारी ३ १ २

औषधनिर्माण अधिकारी १ १ अतिरिक्त पदभार

प्रयोगशाळा वैज्ञानिक १ रिक्त १

आरोग्यसेविका ६ २ ४

आरोग्यसेवक ५ ३ २

परिचर ४ २ २

-----------------------------------------------------------------------

एकूण २५ १४ ११

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT