Accidental car.
Accidental car. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Accident News : 3 दिवसांनंतरही संशयित फरारीच; अपघातात भावा-बहिणीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पिंपळनेर : निजामपूर ते वासखेडी (ता. साक्री) मार्गावर खडकी नाल्याजवळ कार आणि दुचाकीत भीषण अपघात झाला. यात चुलत भावा-बहिणीचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त नातेवाइकांसह ग्रामस्थांनी या घटनेतील आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेहाला हात लावू देणार नाही, अशी ठिय्या आंदोलनातून आक्रमक भूमिका घेतली. (Dhule Accident News)

आरोपी कारच्या काचा फोडून घटनास्थळावरून फरारी झाले. ते अद्याप निजामपूर पोलिस ठाण्याच्या हाती लागलेले नाहीत. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांना घटनास्थळी पाठविले. त्यांच्यासह पोलिस उपअधीक्षक साजन सोनवणे.

निजामपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड, उपनिरीक्षक कोळी यांनी घटनास्थळी उपस्थित नातेवाईक व ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आरोपीस लवकर ताब्यात घेऊन कारवाईचे आश्वासन श्री. काळे यांनी दिल्यावर संतप्त नातेवाइकांनी सात तासांनंतर मृतदेह ताब्यात घेतले.

वासखेडी शिवारातील खडकी नाल्याजवळ सोमवारी (ता. २२) दुपारी साडेचारच्या सुमारास दुचाकी (एमएच ३९, जी ९१००)ने तुषार दादाजी नेरकर (वय ३०) व चुलत बहीण संगीता अनिल सूर्यवंशी (४२, रा. वासखेडी) वासखेडीकडे जात होते. (latest marathi news)

त्यांना मागून कार (एमएच ३९, एल ०१२८)ने जोरात धडक दिली. या घटनेत नेरकर व सूर्यवंशी या काही अंतरावर फेकल्या गेल्या. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण घटनेनंतर कारच्या काचा फोडून कारमधील आरोपी फरारी झाले. ही माहिती मिळताच संतप्त नातेवाईक व शेकडो ग्रामस्थांनी घटनास्थळी आक्रमक पवित्रा घेत ठिय्या आंदोलन सुरू केले.

त्या ठिकाणी निजामपूरचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आक्रमक जमावाने कारचालकास अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत सात तास आंदोलन केले. श्री. धिवरे आणि श्री. काळे यांच्या प्रयत्नांती सोमवारी रात्री अकरानंतर आंदोलन मागे झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT