Rahul Gandhi visiting former minister Rohidas Patil at his residence and inquiring about his health. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधींकडून रोहिदास पाटील यांची विचारपूस

Rahul Gandhi : भारत जोडो यात्रेनिमित्ताने धुळ्यात आलेल्या खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांची देवपूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो यात्रेनिमित्ताने धुळ्यात आलेल्या खासदार राहुल गांधी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील यांची देवपूर येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी त्यांनी गळाभेट घेत ‘कैसे हो दाजीसाहब!’ असे म्हणत तब्येतीची विचारपूस केली.

लताताई पाटील व अश्‍विनी पाटील यांनी श्री. गांधी यांचे औक्षण करून स्वागत केले. आमदार कुणाल पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. (Dhule occasion of Bharat Jodo Yatra Rahul Gandhi met senior Congress leader Dajisaheb Rohidas Patil at his residence)

श्री. गांधी यांनी माजी मंत्री पाटील यांची वैद्यकीय उपचाराबाबत माहिती जाणून घेतली, तसेच आरोग्याच्या टिप्स देत त्यांची तब्येतीची काळजी घ्यावी, असेही सांगितले. लताताई पाटील यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याही तब्येतीबाबत श्री. गांधी यांना विचारले.

त्या वेळी त्यांनी थेट श्रीमती सोनिया गांधी यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला व लताताई पाटील यांचे बोलणे करून दिले. या वेळी श्रीमती गांधी यांनी माजी मंत्री पाटील यांच्याही तब्येतीची विचारणा केली.

काही मिनिटांच्या भेटीत राहुल गांधी यांनी चहा घेत पाटील परिवारात एकरूप झाले. रोहिदास पाटील यांचे गांधी परिवाराशी असलेले ऋणाबंध यानिमित्ताने अधिक घट्ट झाल्याचे पाहायला मिळाले. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : जातपडताळणी समिती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार काम करते, त्यात सरकारचा हस्तक्षेप नाही; जरांगेंच्या आरोपावर फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं

२२ दिवसांपूर्वी उद्घाटन, एक्सप्रेसवे खचला; पॅचवर्क सुकवण्यासाठी लावले १० पंखे, VIDEO VIRAL

Asaram Bapu Bail Rejected : आसाराम बापूंना सुप्रीम कोर्टाचा झटका; अंतरिम जामीन अर्ज फेटाळला, नेमकं कारण काय?

WhatsApp ग्रुप चॅट्समध्ये मोठे बदल; '@all' टॅगसह आले ३ नवीन धमाकेदार फीचर्स!

Nitin Gadkari: घृणास्पद, आक्षेपार्ह आणि अश्लील कंटेंट; गडकरींची बदनामी करणाऱ्या पोस्ट हटवा, हायकोर्टाचे आदेश

SCROLL FOR NEXT