As the climate is changing, laborers filling Rangada onion stalks. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Onion Crisis : दुष्काळात मेहनतीने कांदा पिकवूनही डोळ्यात अश्रू; वातावरण बदलाचा फटका

Dhule News : प्रत्येक महिन्याला वातावरण बदलाचा फटका बसत आहे. सर्वाधिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या वातावरणात मोठा बदल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : प्रत्येक महिन्याला वातावरण बदलाचा फटका बसत आहे. सर्वाधिक फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या वातावरणात मोठा बदल झाला आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाचा शिडकावा होत आहे. शेतकरी उन्हाळ कांदा वाचविण्यासाठी मोठी धडपड करीत आहेत. दुष्काळात मेहनतीने कांदा पिकवूनही डोळ्यात आसवेच आहेत. (Dhule Onion farmers are most affected by climate change)

धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री आणि शिंदखेडा तालुक्यात कांद्याचे अधिक उत्पादन घेतले जाते. दुष्काळी स्थिती असल्याने हे क्षेत्र अवघे ५-१० टक्क्यांवर आले आहे. ठिबक आणि तुषार सिंचनावर कांदा फुलवीत आहेत. दुष्काळात अन् ऐन उन्हाळ्यात कांदा पिकविणे कठीण असते.

कापडणे, देवभाने, न्याहळोद, सरवड, सोनगीर, नंदाणे, बुरझड, बोरीस, लामकानी, कुसुंबा, नेर व खेडे या पट्ट्यातील शेतकरी कांदा पिकविण्यात माहीर आहेत. कांद्याला कधीही मनाप्रमाणे भाव मिळालेला नाही. तरी उत्पादन घेण्यासाठी नेहमीच तयार असतात. आता दुष्काळातही कांदा पिकविण्यासाठी विविध प्रयत्न करीत आहेत.

वातावरण बदलाचा फटका

प्रत्येक महिन्यात वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका कांद्याला बसत आहे. बहुतांश शेतकऱ्यांची कांदा आवरण्यासाठी धडपड सुरू आहे. काढलेला कांदा कट्ट्यात भरला जात आहे. शेडमध्ये साठविण्यासाठी धावपळ होत आहे. (latest marathi news)

निवडणूक काळातही भाव कमी

निवडणूक काळात शेतमालाचे भाव वाढतात, हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. सध्या निवडणूक सुरू आहे. तरीही शेतमालाला अपेक्षित भाव नाही. कांद्याचे भाव गडगडले आहेत. कांद्यास निर्यातबंदीचाही नेहमी फटका बसत आहे. शेतकऱ्यांना निवडणूक काळात निर्यात सुरू करण्याची अपेक्षा होती. ही अपेक्षा धुळीस मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

"कांद्याला प्रतिक्विंटल किमान तीन हजारांचा भाव मिळायला हवा तर परवडतो. शासनाने कांद्याचे धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. सध्या निवडणूक काळात तरी गांभीर्याने बघणे गरजेचे होते." -भरत पाटील, युवा शेतकरी, कौठळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : सैलानी येथे दर्शनाला जात असलेल्या वाहनाचा अपघात

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT