Women sorting onions in the market committee. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Onion News : निर्यातबंदी शिथिल होताच कांदाभावात वाढ! 5 महिन्यांनंतर थोडा दिलासा

Dhule Onion : धुळे बाजार समितीत लाल कांद्याचा भाव सुमारे चारशे रुपयांनी उसळी घेत प्रतिक्विटंल सरासरी दीड हजार रुपयांवर पोचला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Onion News : पाच महिन्यांनंतर कांदा निर्यातीवरील निर्बंध शिथिल झाल्यानंतर धुळे बाजार समितीत लाल कांद्याचा भाव सुमारे चारशे रुपयांनी उसळी घेत प्रतिक्विटंल सरासरी दीड हजार रुपयांवर पोचला. निर्यातदार बाजारात उतरल्याने कांद्याचे दर वाढल्याचे सांगितले जाते. धुळे बाजार समितीत १ ते ४ मेदरम्यान सुमारे १७ हजार ७३ क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. सर्वाधिक दर एक हजार ६५५ रुपये राहिला. (Onion price increases as export ban is relaxed )

निर्यातबंदीमुळे पाच महिन्यांत स्थानिक बाजार समित्यांमध्ये कांद्याला अपेक्षित भाव मिळू शकला नाही, अशी शेतकऱ्यांची तक्रार आहे. शनिवारी (ता. ४) धुळे बाजार समितीत प्रतिक्विंटलला सरासरी एक हजार ४५० रुपये भाव होता. निर्यातीवरील निर्बंध शिथिल झाल्यानंतर दर ३५० ते ४०० रुपयांनी वधारले. या दिवशी सात हजार १३४ क्विंटल कांद्याची आवक झाली.

त्यास किमान ५७५, कमाल एक हजार ६५५ व सरासरी एक हजार ४५० रुपये दर मिळाला. कांदा निर्यातीसाठी प्रतिटन ५५० डॉलर किमान निर्यातमूल्य आणि ४० टक्के निर्यातशुल्क लागू आहे. यामुळे पूर्ण क्षमतेने निर्यात होणार नसल्याचे बाजार समितीतील सूत्रांनी सांगितले. अन्य देशांनी त्यांचा कांदा स्वस्तात देण्याचे धोरण ठेवले तर भारतीय कांद्याला मागणी कमी होईल. (latest marathi news)

जागतिक बाजारातून भारतीय कांद्याला कशी मागणी येते यावर स्थानिक बाजारातील दराचे समीकरण अवलंबून आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयाचे परिणाम १५ ते २० दिवसांनी समोर येतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

बाजार समितीत लाल कांद्याची आवक

तारीख...क्विंटल...सर्वसाधारण भाव...सर्वाधिक भाव

-१ मे...५८१...१,१००...१,२८०

-२ मे...२,२५०...१,१००...१,३१०

-३ मे...७,०७८...१,३२५...१,५१०

-४ मे...७,१६४...१,४५०...१,६५५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT