Patients and their relatives standing in the sun during the afternoon session to collect case papers in a rural hospital. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : केस पेपरसाठी रुग्णांची उन्हात रांग! अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयातील प्रकार; एकाच कर्मचाऱ्यावर भार

Dhule News :

सकाळ वृत्तसेवा

खापर : अक्कलकुवा तालुकाभरातून विविध उपचारांसाठी रुग्ण येथील ग्रामीण रुग्णालयात येतात, परंतु या सर्वांना एकाच दिव्यातून जावे लागते, ते म्हणजे नोंदणी खिडकीतून १०० ते २०० रुग्ण उपचारासाठी येत असताना नोंदणीसाठी केवळ एकच कर्मचारी आहे. यामुळे रुग्णांना तासनतास रांगेत उभे राहावे लागते.

पावसाळ्यातही तापमान ३२ डिग्रीच्या पार गेले असून अधूनमधून पावसाची हजेरी लागते व येथे डोक्यावर छप्परही नाही. यामुळे रुग्णांना उन्हात व पावसात उभे राहावे लागण्याची वेळ आली आहे. (Dhule Patients queue in sun for case papers incident in Akkalkuwa Rural Hospital)

उन्हाचा तडाखा कमी झालेला नाही, परिणामी रुग्णांची गर्दीही वाढत आहे. पूर्वी या विभागाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) १००-१५० वर रुग्णांची नोंद व्हायची. आता ती वाढून १५० ते २०० वर गेली आहे. रुग्णांच्या इमारतीत नोंदणी खिडकी प्रवेशद्वारा शेजारी आहे. या खिडकीतून नोंदणी कार्ड दिले जाते.

परंतु येथे एकच कर्मचारी असतो. या कर्मचाऱ्याला प्रत्येक रुग्णाचे नाव, जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर, दारिद्र्य रेषेखालील असेल तर त्याची नोंद, वयोवृद्ध असेल तर आधार कार्ड किंवा तत्सम कागदपत्रांची नोंद घ्यावी लागते. सोबतच शुल्कही घ्यावे लागते. परिणामी, एका रुग्णाला साधारण तीन ते चार मिनिटांचा वेळ लागतो. (latest marathi news)

विशेष म्हणजे जुन्या, नव्या व महिलांसाठी एकच रांग लागते. यामुळे रांग लांबत जाऊन प्रवेशद्वाराच्या पलीकडे जाते. येथे रुग्णांच्या सोयीसाठी बसायला खुर्च्या नाहीत. नोंदणी खिडकीसमोर शेड नाही. यामुळे रुग्णांना उन्हात उभे राहावे लागते.

विशेष म्हणजे, अनेक रुग्णांसोबत नातेवाईक राहत नाहीत, काही रुग्ण वयोवृद्ध असतात, काहींना समोरचे अस्पष्ट दिसते, त्या स्थितीतही त्यांना ताटकळत तासनतास रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात रुग्ण उपचार घ्यायला येतात की आजारी व्हायला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission News : केंद्रीय कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! DA अन् DR मध्ये लवकरच वाढीचे संकेत

Hindu Youth Killed in Bangladesh : बांगलादेशात आणखी एका हिंदू तरूणाला मारलं! २० दिवसांत कट्टरपंथीयांकडून सातवी हत्या

Pune Election: पुण्यात भाजपने नाराजांची काढली 'अशी' समजूत; तिकीट न मिळालेल्या इच्छूकांवर नवी जबाबदारी

MPSC Success : येरमाळ्याच्या वैभवची यशाची 'हॅट्ट्रिक'! तलाठी, एसटीआयनंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून 'पुरवठा अधिकारी' पदी झेप!

Caste Certificate Protest : मुलाला जातीचा दाखला नाकारला; अन् आईने टॉवरवर चढून १४ तास केले आंदोलन; पोलिसांच्या शिष्टाईने सुखरूप सुटका!

SCROLL FOR NEXT