The water scarcity problem at Vikharan has been resolved after a fifteen-year hiatus by filling the lake. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : विखरणचा पाझर तलाव भरला; डझनभर गावे टँकरमुक्त

Dhule News : विखरण (देवाचे) येथील पाझर तलाव चौदा ते पंधरा वर्षांनी भरला. त्यामुळे आगामी दोन वर्ष परिसरातील डझरभर गावे टँकरमुक्त होणार असून, रब्बीच्या पिकांचीही हमी वाढली आहे.

रणजित राजपूत

Dhule News : विखरण (देवाचे) येथील पाझर तलाव चौदा ते पंधरा वर्षांनी भरला. त्यामुळे आगामी दोन वर्ष परिसरातील डझरभर गावे टँकरमुक्त होणार असून, रब्बीच्या पिकांचीही हमी वाढली आहे. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटल्यामुळे बळीराजा समाधानी झाला आहे. विखरण हे शिंदखेडा तालुक्यातील अवर्षणप्रवण क्षेत्रातील कायमस्वरूपी दुष्काळी छायेतील पाणीटंचाईचे चटके सहन करणारे गाव आहे. (percolation pond at Vikharan filled)

येथे ३० ते ३५ एकर क्षेत्रात पाझर तलाव आहे. हा तलाव दीड दशकापासून पुरेशा पर्जन्यमानाअभावी कोरडाठाक होता. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासाठीच केवळ या तलावाचा वापर होत. येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई होती.

विहिरींनीही तळ गाठला होता. त्यामुळे पाच ते सात वर्षांपासून रब्बी पिकांपासून शेतकरी दुरावला होता. परिणामी, रोजगारासाठी अनेकांनी गुजरात राज्याकडे स्थलांतर केले होते. यावर्षी श्री द्वारकाधीश मंदिराच्या पाठीमागील तलाव २० जुलैपर्यंत भरल्यामुळे बळीराजा सुखावला आहे. (latest marathi news)

येथे आज पर्यंत ३५० मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे पिकनिहाय स्थिती समाधारक आहे. विखरण परिसरातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगामही जोरात राहणार आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे दोन वर्षापर्यंत पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटणार असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Megablock: पावसाचा हाहाकार अन् लोकलचा खोळंबा! मुंबईकरांनो वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, 'या' मार्गावर मेगाब्लॉक

Maharashtra Farmers: पीकविमा योजनेत डिजिटल सर्वेक्षण बंधनकारक, चार प्रमुख बदल; फसवणूक केल्यास ५ वर्षे कोणताच लाभ नाही

Marathi Live Updates : सुकळी खिंडीत पाण्याचा महासागर; गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

Satara: कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार! धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक; १२ तासात ७८७ मिमी पाऊस

Cabinet Reshuffle: ते दोन केंद्रीय मंत्री कोण? भाजप कार्यालयात पोहोचताच राजीनाम्याच्या चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT