Patients admitted to rural hospitals.
Patients admitted to rural hospitals. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : अमळथ्यात भगरीतून विषबाधा; 50 ते 60 जणांवर शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उपचार

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : अमळथे येथे अंत्ययात्रेसाठी आलेल्यांना देण्यात आलेल्या भोजनातून (भगर) पन्नास ते साठ जणांना विषबाधा झाली. भोजनानंतर साधारणतः दोन तासानंतर लोकांना उलटी, चक्करचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने अनर्थ टळला.

यामध्ये लहान मुलं, स्त्रिया आणि पुरुषांचा समावेश आहे. अमळथेचे सरपंच मनोहर पवार व गावातील नागरिकांनी त्रास होत असलेल्या रुग्णांना तत्काळ मिळेल त्या वाहनाने शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात आणले. (Dhule Poisoning by food in Amalthe 50 to 60 people were treated at Shindkheda Rural Hospital)

वैद्यकीय अधीक्षक डॉ. भूषण काटे व आयुष्य वैद्यकीय अधिकारी डॉ.विनय पवार यांनी उपचार केले. अमळथे येथे शुक्रवारी एकाचे निधन झाले होते. त्यांच्या अंत्ययात्रेला आलेल्या सर्व नातेवाइकांना भोजन देण्यात आले.

महाशिवरात्री असल्याने भोजनात फराळाचे (भगर) पदार्थ होते. जेवणानंतर दीड ते दोन तासांनी अनेकांना उलटी, मळमळ, चक्करचा त्रास सुरू झाला. दूषित अन्नातून किंवा पाण्यातून हा त्रास झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात 50 ते 60 रुग्ण दाखल आहेत. यात आठ लहान मुलं, सतरा महिला, पंचवीस पुरुष यांचा समावेश आहे. (latest marathi news)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमने-सामने

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT