Crime sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime : धुळे पोलिसांचे 'ऑपरेशन ऑलआउट': गुन्हेगारीवर मोठा हातोडा, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Massive Police Operation Across Dhule District : धुळे जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ऑपरेशन ऑलआऊट अंतर्गत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रे, दारू व जुगार साहित्य जप्त करत संशयितांना अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

धुळे- जिल्हा पोलिस प्रशासनाने वेळोवेळी गुन्हेगारी कारवाया आणि अवैध व्यवसायांवर रोख आणण्यासाठी कारवाईची पावले उचलली आहेत. यात जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) पहाटे चारपासून सर्वांत मोठी कारवाई अर्थात ऑपरेशन ऑलआऊट राबविण्यात आले. जिल्ह्यातील १७ पोलिस ठाण्यांसह एलसीबी, वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाईचा बडगा उगारत अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या.

या कारवाईत देशी बनावटीचे तीन पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे, चार तलवारी जप्त करीत सर्व संशयितांना अटक करण्यात आली. पोलिस पथकाने गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात फरार असलेले पाच आणि प्रतिबंध असूनही जिल्ह्यात वावरत असलेल्या एका संशयिताला अटक केली. धुळे शहर आणि जिल्ह्यात अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी कारवायांवर रोख आणणे आणि गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी वेळोवेळी कारवाईचे सत्र राबविले आहे.

यात पुन्हा शनिवारी पहाटे चारपासून मध्यरात्रीपर्यंत ठिकठिकाणी धडक कारवाई करण्यात आली. कारवाईचा बडगा उगारताना पोलिसांनी हातभट्टीची दारू निर्माण करणाऱ्यांविरोधात ६३ ठिकाणी कारवाई करीत दारू निर्माण करणाऱ्यांना अटक केली. जुगार खेळविल्या जात असलेल्या ४० ठिकाणी कारवाई करीत जुगाऱ्यांनाही अटक केली. निरनिराळ्या गुन्ह्यात फरार असलेल्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. शिवाय शहरातून हद्दपार केलेल्या एका संशयिताला अटक करण्यात आली. मोटार वाहन कायद्यानुसार निरनिराळ्या स्वरूपाच्या चुका करणाऱ्यांवर ३०० गुन्हे दाखल करण्यात आले. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या सात जणांवर कारवाई करण्यात आली.

सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या १४ जणांवर, तसेच पान टपरीवर दारू पिणाऱ्या चार जणांवर कारवाई करण्यात आली. निरनिराळ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊनही दाद देत नसलेल्या २९ जणांवर वॉरंट बजावण्यात आले. तसेच, गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या २१ जणांची तपासणी करण्यात आली. शहरातील १०२ लॉज आणि ढाब्यांची, तसेच तीन ओयो हॉटेलची तपासणी करण्यात आली. विविध २४ ठिकाणी नाकाबंदी करीत संभाव्य गुन्हे रोखण्याचा प्रयत्न पोलिस पथकांकडून झाला. सात वाहनांच्या चोरीची उकल झाली. संशयितरित्या फिरणाऱ्या एकाला अटकही करण्यात आली.

पोलिस हे कायद्याच्या चौकटीत राहून मेहनतीने आपले कर्तव्य बजावत आहेत. धुळे शहर व जिल्ह्यात शांतता राहील याकडे जबाबदारीने लक्ष ठेऊन आपले सेवाकार्य करीत आहेत. कोणी काही बरळले तरी हे या आधीच्या सर्व कारवाया आणि ऑपरेशन ऑलआऊट सारख्या कारवायांमधील आकड्यांनी सिद्ध होते.

- श्रीकांत धिवरे, जिल्हा पोलिस अधीक्षक, धुळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pooja Khedkar : वादग्रस्त पूजा खेडकरचं OBC नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र अखेर रद्द; नाशिक विभागीय आयुक्तांची मोठी कारवाई

कोर्टाला धर्मातलं काही कळत नाही, धार्मिक मुद्द्यांसाठी धार्मिक न्यायालय; शंकराचार्यांनी केली मोठी घोषणा

'माझा मृत्यू झाला तर त्याला नाना पाटेकर जबाबदार' तनुश्री दत्ताचा गंभीर आरोप, म्हणाली, 'मला भिती दाखवण्याचा..'

Nagpur Railway : नागपूरमार्गे धावणाऱ्या रेल्वेत लावणार सीसीटीव्ही; कॅमेरा फुटेजचे ‘एआय’कडून विश्लेषण, प्रवाशांना मिळणार सुरक्षा

Weather Update : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, हवामान विभागाचा पुढील तीन दिवसांचा अंदाज; वाऱ्यामुळे समुद्र खवळला

SCROLL FOR NEXT