Rikshwa esakal
उत्तर महाराष्ट्र

धुळे पोलिसांचा रिक्षाचालकांना दणका; 50 जणांवर कारवाई

वाहतूक शाखेने शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील सुमारे ५० रिक्षाचालकांवर कारवाई केली.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : परमीट नसणे, पासिंग नसणे तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण करणे आदी विविध कारणांनी वाहतूक शाखेने शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाजवळील सुमारे ५० रिक्षाचालकांवर कारवाई करत रिक्षा पोलिस ठाण्यात आणल्या. दरम्यान, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत याप्रश्‍नी पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांची भेट घेतली. चर्चेअंती पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांनी सहकार्याची भूमिका घेत ३१ जुलैपर्यंत कारवाई न करण्याचे आश्‍वासन दिले.

जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांच्या आदेशाने वाहतूक शाखेने मंगळवारी (ता.७) दुपारी एसटीच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या, परमीट, पासिंगबाबत कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू केली. यात सुमारे ५० रिक्षा वाहतूक शाखेने पोलिस ठाण्यात आणून ठेवल्या. या कारवाईनंतर भांबावलेल्या रिक्षाचालकांनी शिवसेनेचे कार्यालय गाठत शिवसेनेचे महानगरप्रमुख मनोज मोरे यांच्याकडे कैफियत मांडली. रिक्षाचालकांची कैफियत ऐकून घेत श्री. मोरे, धीरज पाटील, भरत मोरे, संजय वाल्हे, कैलास पाटील, कैलास मराठे आदींनी पोलिस निरीक्षक धीरज महाजन याची भेट घेतली. मात्र, पोलिस निरीक्षक श्री. महाजन यांनी पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने कारवाई होत असल्याचे म्हणत कारवाई थांबविता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी याप्रश्‍नी पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांची भेट घेतली व रिक्षा चालकांबाबत सहानुभूतीची भूमिका घ्या अशी मागणी केली.

तसेच आरटीओ विभागाने ज्याप्रमाणे ३१ जुलैपर्यंत मुदत दिली आहे, तशी मुदत पोलिसांनी द्यावी. दरम्यानच्या काळात पोलिसांसह सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून याबाबत रिक्षा चालकांचे प्रबोधन करू अशी विनंती श्री. मोरे व पदाधिकाऱ्यांनी केली. त्यावर पोलिस अधीक्षक श्री. पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत सहानुभूतिपूर्वक ३१ जुलैपर्यंत कारवाई न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे तूर्त रिक्षाचालकांवरील कारवाईचा बडगा दूर झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT