Due to heavy rain, the field is flooded with water. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Pre-Monsoon Rain : कापडणे परिसरात मुसळधार पावसाची हजेरी; शेतकरी सुखावला

Pre-Monsoon Rain : परिसरात रविवारी (ता.९) रात्री विजांच्या कडकडाटात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्‍यासह सलग एक तास मुसळधार पाऊस झाला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Pre-Monsoon Rain : परिसरात रविवारी (ता.९) रात्री विजांच्या कडकडाटात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्‍यासह सलग एक तास मुसळधार पाऊस झाला. मृगाच्या सुरवातीलाच पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला आहे. दुष्काळाने होरपळून निघालेल्या शेतकऱ्‍यांमध्ये पेरणीसाठी लगबग वाढली आहे. काही शेतांना तलावाचे स्वरूप आले होते. वादळी वाऱ्‍याने काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. (Rain Farmers are happy due to heavy rain in Kapadane area)

कापडणे परिसरातील धनूर, दापुरा, दापुरी, डोंगरगाव, हेंकळवाडी, तामसवाडी, कौठळ, न्याहळोद, जापी, बिलाडी, धमाणे, नगाव, तिसगाव, ढंढाणे, रामनगर, वडेल, देवभाने, सायने, नंदाणे व सरवड शिवारात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे पेरणीस चालना मिळाली आहे.

मृगातील अमृतधारा

गेल्या वर्षी मृग नक्षत्रात पाऊस झाला नव्हता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाला. पंधरा जुलैपर्यंत पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. त्यानंतर पावसाने दडी मारली होती. पुढे पावसाचे प्रमाण घटतेच राहिले. अन भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला. आता मृगाच्या सुरवातीलाच पेरणी योग्य पावसाने हजेरी लावली आहे. शेतकऱ्‍यांनी मृगातील या जलधारांना अमृतधारा असे संबोधत आनंद व्यक्त केला. (latest marathi news)

पेरणीस प्रारंभ

परिसरात पेरणीस प्रारंभ झाला आहे. मका, कापूस, बाजरी, ज्वारी, भुईमूग, उडीद, मुग, चवळी, तूर आदींची पेरणी सुरु झाली आहे. मजुरांची शोधाशोधही होत आहे.

धुळ पेरणीने समाधानी

धुळ पेरणी केलेले शेतकरी कालच्या पावसाने अधिक सुखावले आहेत. धुळ पेरणीनंतर कमी प्रमाणात पाऊस झाला. अन पावसाने आठ-दहा दिवस दडी मारल्यास बियाणे वाया जाते. शेतकऱ्‍यांनी कालचा पाऊस परिपूर्ण झाल्याने समाधान व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT