Devendra Mali, who sells various fruits and vegetables in Pitrupaksha. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : पितृपक्षातही भाजीपाल्याचे दर पन्नाशीच्या आतच! पावसाचा निर्यातीवर परिणाम; स्थानिक बाजारात भाज्यांची रेलचेल

Latest Dhule News : सततचा पाऊस सुरु असल्याने मोठ्या शहरांमध्ये भाजीपाला पोहच करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहे. परिणामी, स्थानिक बाजारातच पालेभाज्यांची रेलचेल वाढली आहे आणि भावही घटले आहे.

जगन्नाथ पाटील

कापडणे : खानदेशात पितृपक्षाला अनन्यसाधारण महत्त्व असते. पूर्वजांप्रती आगारी आणि नैवेद्य दाखविण्यासाठी साऱ्‍यांचीच लगबग सुरु आहे. यासाठी विविध भाजीपाला आवश्यक आहे. भाज्यांना मागणी वाढूनही दर घटण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. सततचा पाऊस सुरु असल्याने मोठ्या शहरांमध्ये भाजीपाला पोहच करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहे. परिणामी, स्थानिक बाजारातच पालेभाज्यांची रेलचेल वाढली आहे आणि भावही घटले आहे. (price of vegetables within 50 even in Pitrupaksha)

पितृपक्षात सर्वच हिरवा भाजीपाला प्रतिकिलो साठ ते सत्तरच्या पुढेच असतो. यावर्षी प्रथमच सर्वच भाजीपाल्यांचे दर पन्नाशीच्या आत आहे. पितृपक्ष सुरु झाला आणि पुन्हा पाऊस सक्रीय झाला. सातत्यपूर्ण पावसामुळे भाजीपाला दूरच्या बाजारात पोहचत नसल्याची स्थिती आहे. स्थानिक बाजारात भाजीपाला अधिक विक्रीसाठी दाखल होत आहे. त्यामुळे भाव उतरले आहेत.

देवडांगरला अधिक मागणी

पितृपक्षातील आगारीसाठी देवडांगरची मागणी वाढली आहे. प्रतिकिलो २० याप्रमाणे असलेला भाव चाळीसवर गेला आहे. दुप्पटीने भाव वाढल्याने शेतकऱ्‍यांमधून समाधान व्यक्त होत आहे. (latest marathi news)

कोथिंबीर, मेथीची शंभरी

पंधरा दिवसांपूर्वी कोथिंबीरीचे भाव प्रतिकिलो तीनशेवर पोहचले होते. ते पितृपक्षात शंभरावर आले आहे. मेथी दोनशेवर होती. तिही शंभरावर आली आहे.

प्रतिकिलोचे दर

फ्लॉवर : ४०

भेंडी : २०

वांगी : ४०

मिरची : ५०

टोमॅटो : ४०

कारले : ६०

कटुर्ले : ५०

गिलके : ५०

पालक : ४०

शेवगा : ६८

मुळा : ४०

पोकळा : ४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT