Road march of Rashtriya Swayamsevak Sangh on the occasion of Dussehra. Shrikant Dhiware during Shastrap Puja at Police Headquarters. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dussehra 2024 : धुळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन; पोलिस मुख्यालयात शस्त्रांसह वाहनांचे पूजन

Dussehra : विजयादशमीनिमित्त पोलिस दलाने शनिवारी (ता. १२) पोलिस मुख्यालयात शस्त्रपूजन केले.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : विजयादशमीनिमित्त पोलिस दलाने शनिवारी (ता. १२) पोलिस मुख्यालयात शस्त्रपूजन केले. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देवपूरमध्ये पथसंचलन करीत आश्वासक वातावरणाची निर्मिती केली. हिंदू धर्म संस्कृतीत साडेतीन मुहूर्त पवित्र मानले जातात. यात दसऱ्यानिमित्त जिल्हा पोलिस दलातर्फे पोलिस मुख्यालयात पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते शस्त्रपूजन झाले. ( march of Rashtriya Swayamsevak Sangh Worshiping vehicles with weapons at police headquarters )

तसेच संदेशवहन यंत्रणा, वाहनांचेही पूजन झाले. पोलिस उपअधीक्षक विश्वजित जाधव, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिषेक पाटील, शहराचे पोलिस निरीक्षकांसह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शस्त्रपूजनानंतर पोलिस मुख्यालय परिसरातील मंदिरात जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पूजनासह दर्शन घेतले. (latest marathi news)

देवपूरला पथसंचलन

विजयादशमी अर्थात दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे देवपूरमध्ये पथसंचलन झाले. शहरातील महाजन हायस्कूलच्या प्रांगणात स्वयंसेवक एकत्र आले. पारंपरिक पेहरावात स्वयंसेवकांनी शिस्तबद्धपणे संचलन केले. धर्म रक्षण आणि महिलांच्या सुरक्षितेतसाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे अभिवचन संचलनातून स्वयंसेवकांनी दिले.

दुर्गामाता दौड

नवरात्रोत्सवात संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठानतर्फे दुर्गामाता दौड काढण्यात आली. विजयादशमीच्या दिवशी मनोहर चित्र मंदिरापासून दुर्गामाता दौड काढण्यात आली. ‘भारत माता की जय’, अशी घोषणा देत निघालेल्या दुर्गामाता दौडचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. दुर्गामाता दौडचा समारोप श्री एकवीरादेवी मंदिराजवळ झाला. शिवप्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT