Officials and activists of Shiv Sena Ubhata protesting against the administration of Municipal Corporation in Dhule city. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule: धुळ्यात शिवसेना UBTकडून विरोधी भाजप लक्ष्य! विकासाचे गाजर दाखविल्याचा आरोप; मनपाला हजारो कोटी मिळूनही सोयीसुविधांची वानवा

Latest Political News : विकासासह मुलभूत सोयीसुविधांची वानवा असल्याचा आरोप आणि यात प्रतिकात्मक रावणाचे दहन करत शिवसेना ‘उबाठा’ने भाजपला लक्ष्य केले.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहराच्या विकासाचे गाजर दाखवून भाजपने येथील महापालिकेत बहुमताच्या जोरावर सत्ता मिळविली. यात सरकारच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी विकास कामांसाठी आणला गेल्याचा दावा करण्यात आला. तरीही विकासासह मुलभूत सोयीसुविधांची वानवा असल्याचा आरोप आणि यात प्रतिकात्मक रावणाचे दहन करत शिवसेना ‘उबाठा’ने भाजपला लक्ष्य केले. (Shiv Sena UBT targets BJP)

शिवसेना ‘उबाठा’ने महापालिका परिसरात घोषणाबाजी करत भाजपच्या कारकिर्दीतील महापालिकेतील कारभाराचा निषेध केला. शिवसेना सहसंपर्कप्रमुख महेश मिस्तरी, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, किरण जोंधळे, डॉ. सुशील महाजन, धीरज पाटील, गुलाब माळी, भरत मोरे, ललित माळी, संदीप सूर्यवंशी यांनी पत्रकाद्वारे सांगितले, की विविध योजनेत मनपाचा हिस्सा असलेल्या विकासकामांच्या ३० टक्के निधीसाठी धुळेकरांवर मालमत्ता कराचा बोझा लादण्यात आला.

राज्य नगरोत्थान योजना, भूखंड हेराफेरी, अक्कलपाडा पाणीपुरवठा योजना, ब्रिटीशकालीन जलवाहिनी बदलविणे, अमृत योजना, मलःनिस्सारण योजना, स्वच्छता ठेका, मरुम घोटाळा यासह विविध कामांमध्ये आर्थिक हेराफेरी झाल्याचा आरोप आहे. (latest marathi news)

शिवसेनेचे प्रश्‍न

शहराच्या विकासासाठी पाच वर्षांत आलेल्या सरासरी दीड हजार कोटी रुपयांच्या कामात काय घडले हे धुळेकरही जाणून आहेत. त्यात काही मनपा अधिकाऱ्यांनी संगनमत केले. त्यामुळे प्रतिकात्मक रावण पुतळ्याचे दहन करण्यात आले. महापालिकेकडून सर्वसामान्यांना सुखसोयी मिळण्याऐवजी काही जण गब्बर झाले.

त्याकडे विद्यमान आमदार, माजी खासदारांनी का दुर्लक्ष केले? शहर विकासाच्या गप्पा मारायच्या आणि वर्गणी, भेटवस्तूंचे वाटप करत निवडणुकीची तयारी करायची म्हणजेच मतदारांना हलक्यात घेण्याचा हा प्रकार आहे का? मतदारांनी हे ओळखून सुज्ञपणे निवडणुकीला सामोरे जावे. शहर विकासासाठी शिवसेना उबाठाच्या सक्षम उमेदवाराला पाठबळ द्यावे, असे निवेदनात म्हटले आहे.

या वेळी अण्णा फुलपगारे, देवा लोणारी, मच्छिंद्र निकम, शिवाजी शिरसाळे, दिनेश पाटील, कैलास मराठे, संदीप चौधरी, मनोज शिंदे, सुभाष मराठे, विष्णू जावडेकर, विकास शिंगाडे, मुन्ना पठाण, कपिल लिंगायत, शरद गोसावी, संजय जवराज, आनंद जावडेकर, नासिर पिंजारी, तेजस सपकाळ, नाना शिंदे, कार्तिक मुर्तडक आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT