Idol of Sri Ekvira Devi. In the second photo, the crowd gathered for darshan
Idol of Sri Ekvira Devi. In the second photo, the crowd gathered for darshan esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : श्री एकवीरादेवी यात्रोत्सवाला थाटात सुरवात

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : खानदेशची कुलस्वामिनी आणि राज्यातील पाचवे शक्तीपीठ असलेल्या येथील श्री एकवीरादेवी यात्रोत्सवाला सोमवारी (ता. २२) थाटात सुरवात झाली. चैत्र शुद्ध पौर्णिमेपासून यात्रा सुरु होत असते. ती पंधरा दिवस असेल. चावदसनिमित्त अनेक भाविकांनी बालकांचे जाऊळ, शेंडी उतरविली. मनोकामना पूर्ण झाली म्हणून अनेक महिलांनी केस, तर काही महिलांनी केसाची बट अपर्ण केली. (Dhule Shri Ekvira Devi Jatrotsav begins with grandeur)

चावदसनिमित्त घरोघरी पिठाचे दिवे बनवून देवीची आरती करीत पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. पांझरा नदीकिनारी श्री एकवीरादेवी मंदिरासह परिसरात सोमवारी पहाटेपासून भक्तिमय वातावरण तयार झाले. चैत्र पौर्णिमेला श्री एकवीरादेवीचा यात्रोत्सव होतो. पौर्णिमेच्या आदल्या दिवशी चावदसनिमित्त कुलाचार होतात.

श्री एकवीरादेवी मंदिरात सोमवारी कुलाचार, बालकांचे जावळ काढणे, नवस फेडताना केस अपर्ण करणे किंवा केसांची बट अर्पण करण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. अनेकांनी देवीसमोर दिवे तेवत ठेवत देवीचा जयजयकार केला. दर्शनासाठी अलोट गर्दी केल्यावर यात्रौत्सवाला सुरवात झाली.

मंदिर परिसर फुलला

जिल्ह्यासह नाशिक, जळगाव, नंदुरबार, मध्यप्रदेश आणि गुजरातमध्ये स्थायिक झालेले असंख्य भाविक यात्रोत्सवानिमित्त धुळ्यात दाखल झाले आहेत. पहिल्या दिवशी ५० हजारावर भाविकांनी हजेरी लावली. (latest marathi news)

जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी देवीचे दर्शन घेत यात्रोत्सवाच्या नियोजनाविषयी मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्याकडून माहिती घेतली. यात्रोत्सवामुळे मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या अलोट गर्दीमुळे मंदिराचा परिसर फुलला आहे.

भाविकांना आवाहन

मंदिरात सकाळी मान्यवरांच्या हस्ते आदिशक्ती श्री एकवीरादेवीची महापूजा व आरती झाली. मंदिराच्या गाभाऱ्यात नैवेद्य दाखविण्यासाठीही भाविकांची गर्दी उसळली. यात्रोत्सव अक्षयतृतीयेपर्यंत सुरू राहील. यानिमित्त मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहील. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री एकवीरादेवी व रेणुकामाता मंदिर ट्रस्टने केले.

मनोरंजनाची पर्वणी

यात्रोत्सवानिमित्त पांझरा नदी पात्रालगत आकर्षण पाळणे व मनोरंजनाची इतर साधनेही दाखल झाली आहेत. मंदिरापासून पंचवटीपर्यंत पूजेचे साहित्य, संसारोपयोगी वस्तू विक्री, विविध खाद्यपदार्थांची दुकाने थाटण्यात आली आहेत. मनोरंजनासह हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांसाठी ही यात्रा पर्वणी ठरणारी आहे.

महापालिकेतर्फे विविध सोयीसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. भाविकांना देवीचे दर्शन घेता यावे यासाठी विशेष संरक्षक कठडे तयार करण्यात आले आहेत. पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

श्री एकवीरादेवीची आज रथ यात्रा

यात्रोत्सवानिमित्त मंगळवारी (ता. २३) श्री एकवीरादेवीची रथ यात्रा निघेल. त्यात भाविकांना सहभागाचे आवाहन मंदिराचे मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी केले. मंदिरातून रथावर देवीची चांदीची मूर्ती ठेवत शोभायात्रा काढण्यात येईल.

यंदा यात्रेला वाढीव मार्ग देण्यात आला असून सकाळी अकराला चैत्र रथोत्सवाला सुरवात होणार आहे. सायंकाळी उशिरापर्यंत रथ पुन्हा मंदिरात येईल आणि रथोत्सवाचा समारोप होईल. रथ मार्गावर नागरिकांनी सडा-रांगोळी घालत देवीचे स्वागत करावे, असे आवाहन श्री. गुरव यांनी केले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT