Controversial pit in Nehru Chowk underground sewerage scheme. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : रखडलेल्या गटार कामाने घेतला एका मजुराचा बळी; धुळ्यात सुरक्षिततेचे नियम अधिकाऱ्यांकडूनच धाब्यावर

Dhule News : पुढील पंचवीस वर्षांचा विचार करीत देवपूरमध्ये होणारी भूमिगत गटार योजना राजकीय नेत्यांसाठी विकासाबाबत भांडवल करणारी ठरली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरात रखडलेली केंद्र पुरस्कृत भूमीगत गटार योजना आता धोकादायक वळणावर पोचली आहे. देवपूरमध्ये एसएसव्हीपीएस महाविद्यालय आणि नेहरू चौक परिसरात या कामाअंतर्गत मोठे खड्डे करण्यात आले आहेत. गटारीसंबंधी अहोरात्र काम सुरू आहे.

त्यात नागरिक आणि कामगारांच्या सुरक्षिततेविषयी नियम खुद्द जबाबदार अधिकाऱ्यांनी धाब्यावर बसविल्याचे चित्र आहे. असे असताना नेहरू चौक परिसरात कामावेळी माती धसल्याने दबून एका मजुराचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. (Dhule Stalled sewerage job kills one laborer)

पुढील पंचवीस वर्षांचा विचार करीत देवपूरमध्ये होणारी भूमिगत गटार योजना राजकीय नेत्यांसाठी विकासाबाबत भांडवल करणारी ठरली. केंद्र सरकारने या योजनेसाठी दीडशे कोटींचा निधी मंजूर केला. त्याचवेळी योजना पूर्णत्वाचा कालावधी निर्धारित करून दिला.

या योजनेची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून अंमलबजावणी सुरू आहे. त्यासाठी गुजरातच्या कंत्राटदाराला ठेका दिला गेला. सुरवातीपासून खाबूगिरीच्या संस्कृतीत अडकलेली ही योजना देवपूरवासीयांसाठी फायद्यापेक्षा अडचणीची ठरत गेली.

अधिकार गमावला

वाढीव खर्चाचा वाद झाल्यावर काही महिने ठेकेदार काम सोडून पळूनही गेला. त्याविषयी बोंबाबोंब, आंदोलने झाल्यावर पाच वर्षांपासून रखडलेली ही योजना कशीबशी पूर्ववत कामाव्दारे सुरू झाली. खाबूगिरीत अडकलेले जनहितासाठी ही योजना लवकर पूर्ण करावी, कामात गुणवत्ता राखली जावी आणि ठेकेदारावर कारवाईची मागणी करण्याचा अधिकार गमावून बसल्याचे धुळेकर अनुभवत आहेत. त्यामुळे ठेकेदार आणि काही जबाबदार अधिकाऱ्यांवर कुणाचा अंकुश न उरल्याने या योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. अनेक तक्रारी होऊनही केंद्र व राज्य सरकारला या योजनेविषयी चौकशी करावीशी वाटलेली नाही. (latest marathi news)

निष्पाप मजुराचा मृत्यू

नेहरू चौक परिसरात या योजनेंतर्गत बुधवारी (ता. १०) मध्यरात्रीनंतर काम सुरू होते. भूमीगत गटारीसाठी खोदलेल्या वीस ते पंचवीस फुट खोल चारीत काम करताना माती धसल्याने त्याखाली दबून मजूर ठार झाला. अन्य एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना पहाटे तीनच्या सुमारास घडली. डॉ. पंजाबी यांच्या दवाखान्यासमोरील रस्त्यावर जेसीबीच्या साहाय्याने चोरी खोदण्यात आली आहे.

मजूर चारीमधून माती काढून लेव्हलींगचे काम करीत होते. त्यावेळी माती धसल्याने त्याखाली दबून एका दोन मजूर गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यात एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसऱ्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर नेहरू चौकातील काम थांबले आणि संबंधित अधिकारी नॉट रिचेबल झाले. या घटनेत हरसिंग डाबरा (वय २०, रा.मध्य प्रदेश) हा मजूर ठार झाला आहे.

झोपेचे सोंग नको

धुळेकर सहनशीलतेसाठी ओळखले जातात. देवपूरमध्ये भूमीगत गटार योजनेंतर्गत दोन वर्षांपासून खड्डा खोदून काम सुरू आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांची वाट लागली आहे. त्यामुळे अनेकांना हाडे, धुळीमुळे श्‍वसनाचे आजार जडलेही असतील. वाहनांच्या देखभाल दुरूस्तीचा खर्च वाढला असेल.

परंतु, शहरातील कुठल्याही पक्षाच्या लोकप्रतिनिधीला या कामास्थळी उपस्थित होऊन जबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास वेळ मिळालेला नाही. कामाची गुणवत्ता व रस्त्याचा प्रश्‍न कसा मार्गी लागेल याविषयी लोकप्रतिनिधींनी प्रमुख अधिकाऱ्यांना कधी विचारणा केली नाही, असे चित्र दिसून आलेले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारताच्या पोरीचं वर्ल्ड चॅम्पियन! फायनलमध्ये द. आफ्रिकेला पराभूत करत जिंकला पहिला वर्ल्ड कप

Women’s World Cup Final : २५ वर्षानंतर स्वप्नपूर्ती! भारतीय संघाच्या विजयाचे पाच टर्निंग पॉइंट्स... शफाली, दीप्ती अन् श्री चरणी...

World Cup 2025 Final: शफाली वर्माने मॅच फिरवली! बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही ठरतेय भारताची संकटमोचक, घेतल्या दोन विकेट्स

Women’s World Cup Final : 'वळसा' महागात पडला, अमनजोत कौरच्या डायरेक्ट हिटने 'करेक्ट' कार्यक्रम केला; Video Viral

Deputy CM Eknath Shinde: शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; कार्तिकी यात्रा सोहळा

SCROLL FOR NEXT