Tamaswadi Zilla Parishad School. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करा; गुणवत्तेवर परिणाम होत असल्याने नवीन शैक्षणिक वर्षापासून अपेक्षा

Dhule News : जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना वर्षभर विविध अशैक्षणिक कामे करावी लागतात.

जगन्नाथ पाटील

कापडणे : राज्यात जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढत असल्याची चर्चा तीन-चार वर्षांपासून होत आहे. या गुणवत्तेमागे गुरुजींचा दम घुटत असल्याची चर्चा गुरुजींमध्येच होत आहे. वर्षभरातील सण समारंभ, उपक्रम, शाळाबाह्य कामे आणि शंभरावर रजिष्टरमध्ये नोंदी करणे अनिवार्य असून हे सर्व करताना गुणवत्तेवर परिणाम होतो. यामुळेच नवीन शैक्षणिक वर्षापासून शिक्षकांवरील अशैक्षणिक कामे बंद करण्याची मागणी शिक्षकांसह पालकांमधून होत आहे. (Dhule Stop non teaching activities of teachers)

जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना वर्षभर विविध अशैक्षणिक कामे करावी लागतात. यामुळे गुणवत्तेवर परिणाम होत असतो. यात शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ, माता पालक संघ, शालेय परिवहन समिती, शालेय पोषण आहार समिती, गुणवत्ता संनियंत्रण समिती अशा वेगवेगळ्या दहाहून जास्त समित्यांच्या महिनावार बैठका होतात.

त्याचे इतिवृत्त लिहावे लागते. वेगवेगळे विशेष दिवस, सप्ताह, पंधरवाडे, महिने साजरे करून उपक्रमांचे फोटो काढणे, इतिवृत्त लिहिणे, हार्ड कॉपीत अहवाल पाठवणे, ऑनलाइन रिपोर्ट करणे आदींचा समावेश आहे. गुरुजींनी एवढे करून साधारण पन्नासेक रजिस्टर वर्षभर लिहायचे असतात.

बँकेचे सगळे व्यवहार बघायचे असतात. रोज कीर्द, खतावणी लिहिणे, गाव ते तालुक्यातल्या वेगवेगळ्या बैठका, प्रशिक्षण, इतर इव्हेंट्स करायचे असतात. तंबाखूमुक्त शाळा, त्याचे रेकॉर्ड, डिजिटल बोर्ड करणे, प्रभात फेरी काढून गावात दवंडी देणे, निवडणुकांमध्ये निवडणूक अधिकारी व्हा, वर्षभर बीएलओ म्हणून घरोघरी फिरून नवीन मतदार नोंदविणे, हात धुवा दिन, जंतनाशक गोळ्या वाटप त्यासाठी प्रशिक्षण घेणे, सर्व क्रांतिकारक, थोर समाज सुधारक जयंती व पुण्यतिथी साजरी करणे. (latest marathi news)

रेकॉर्डचे रेकॉर्ड ठेवा

शालेय पोषण आहार रेकॉर्ड (आज कोणती डाळ, किती हळद, किती मीठ, किती तेल, किती तांदूळ, किती तिखट, किती मोहरी, किती जिरे) पूर्ण करणे. ऑनलाइन नोंदी रोजच्या रोज करणे. धोकादायक शाळा खोली दुरुस्ती व निर्लेखन प्रस्ताव फोटोसह तयार करणे. शैक्षणिक उठावासाठी गावभर फिरणे व लोकांची बोलणी ऐकणे.

शाळेत भौतिक सोईसुविधा निर्माण करणे. U-D।ES ट्रेनिंग व तो फॉर्म ऑनलाइन भरणे. शाळा सिद्धी प्रशिक्षण घेणे. झाडे लावा, त्यासाठी गावफेरी काढणे. सर्व मुलांची आधार कार्ड झेरॉक्स घेऊन आधारकार्ड नोंद करणे. वर्ग व शाळा सजावट, बाग बगीचा करा.

सर्व मुलांची वजन व उंची घेऊन रजिस्टर भरणे. शाळेत रिकामी पोती (बारदान) गोळा करून, मोजून, हिशेब ठेवणे. इंग्रजी व खासगी शाळांतून आलेल्या मुलांची माहिती गोळा करून स्वतंत्र अहवाल देणे. ग्रामस्वच्छता अभियान राबवणे. किशोरवयीन मुला-मुलींसाठी कार्यशाळा घेणे. अशा विविध रेकॉर्डमुळे गुरुजी मेटाकुटीस येतात.

मग गुणवत्ता कशी वाढवायची

एवढी अशैक्षणिक कामे लावली गेली आहेत. शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवायची, गुरुजींना अशैक्षणिक कामाला जुंपून शासनाला सरकारी शाळा तर बंद करून टाकायच्या नाहीत ना, असा प्रश्नही जाणकारांमधून उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amravati News : दहा दिवसांच्या बाळावर अघोरी उपचार; गरम विळ्याने दिले ३९ चटके अन्... मेळघाटातील धक्कादायक प्रकार

Tulsi Remedies Ekadashi: आषाढी एकादशीला करा तुळशीचे 'हे' उपाय सर्व मनोकामना होतील पूर्ण

Ashadhi Wari: विदर्भातून १५९४ मध्ये निघाली पहिली पालखी; १९३८ दिंड्या पंढरपुरात,रुक्मिणी संस्थान नंतर चंदाजी महाराज दिंडीचा समावेश

Elon Musk New Party: इलॉन मस्क स्थापन करणार अमेरिकेतील तिसरा सर्वात मोठा पक्ष, डोनाल्ड ट्रम्प यांचा फायदा होणार की नुकसान?

Ashadhi Ekadashi: देहेडच्या पुरातन वटवृक्षावर ‘कान्होपात्राची महावेल’;भोकरदन तालुक्यातील विठ्ठल भक्त दर्शनासाठी करतात गर्दी

SCROLL FOR NEXT