Pomegranate gardens are covered with white netting to protect them from sunburn. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Drought News : टंचाईत 6 एकर डाळिंबबाग जगविण्यासाठी ककाणीत आटापिटा

Dhule Drought : पारंपरिकऐवजी फळशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक उभारी मिळाली आहे.

दगाजी देवरे : सकाळ वृत्तसेवा

Dhule Drought News : यंदा वाढते तापमान, पाणीटंचाई व दुष्काळी स्थितीचा फटका फळशेतीलाही बसला आहे. पारंपरिकऐवजी फळशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक उभारी मिळाली आहे. आग ओकणाऱ्या उष्णतेमुळे डाळिंबबागेत फुलगळतीचे संकट होते. ककाणी (ता. साक्री) येथील युवा शेतकऱ्याने तोकड्या पाण्यात सहा एकर डाळिंबबाग जगवत ऐन दुष्काळात टंचाईवर मात केली आहे. ( Struggle in Kakani to maintain 6 acres of pomegranate orchard during drought )

सहा एकर क्षेत्रात महागड्या पांढऱ्या नेटने आच्छादन करत डाळिंबबागेस उन्हापासून संरक्षण दिले आहे. अलीकडे नोकरीची अपेक्षा न करता साक्री तालुक्यातील अनेक तरुण फळशेतीकडे वळले आहेत. ककाणी येथील तरुण शेतकरी गोरख साहेबराव बेडसे वडिलांच्या निधनानंतर वडिलोपार्जित शेतीत कष्ट, मेहनतीतून भाजीपाला, फळशेती करत आपले स्वप्न पूर्ण करत आहेत.

अलीकडे शेती व्यवसायात दिवसेंदिवस ‘रिस्क’ असल्याचे वास्तव आहे. घरातील सदस्यांचे पाठबळ असेल तर शेती व्यवसायातही अपयश नाही हेच श्री. बेडसे यांनी सिद्ध केले आहे. यंदा विहिरींनी तळ गाठल्याने अनेक शेतकऱ्यांनी हात टेकले आहेत. पाणीच नसेल तर शेती करणे म्हणजे मातीत परीस शोधण्यासारखे आहे.

सनबर्निंगचे संकट ‘आ’ वासून

अवघ्या दोन अडीच तास वीजपंप चालणाऱ्या विहिरीच्या पाण्यावर सहा एकर डाळिंबबाग कशीबशी जतन केली खरी पण यंदाच्या प्रचंड तापमानाचा परिणाम धोक्याची घंटा दाखवत होता. यातून स्वतःला सावरत सुमारे तीन लाख रुपये खर्च करत सहा एकर डाळिंबबागेवर पांढऱ्या जाळीदार नेटने आच्छादन केले आहे. पाणीटंचाई, वाढत्या उष्णतेचा बागांना फटका बसू नये म्हणून हा आर्थिक खर्च केल्याची माहिती श्री. बेडसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

अजूनही महिनाभर बाग उभी राहणार असून, जूनअखेरपर्यंत बागेतील फळ काढणी केली जाईल. आरंभापासूनच ४० अंश सेल्सिअस तापमानामुळे मोठ्या प्रमाणात फुलगळती झाली आहे. ती रोखण्यासाठी बागांना पश्चिम-उत्तर बाजूने पांढऱ्या जाळीदार नेटने आच्छादन केले आहे.

काटकसरीने पाणी देत जगविली बाग

यंदा अत्यल्प पावसामुळे विहिरींची पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. चोवीस तास वीजपंप सुरू ठेवणाऱ्या विहिरी तास-अर्ध्या तासावर आल्या आहेत. वडील (कै.) साहेबराव सुपडू बेडसे यांनी शेती व्यवसायात प्रगती साधल्याचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेवत गोरख बेडसे व मच्छिंद्र बेडसे यांनी शेतीत नवनवीन प्रयोग करत कृषी विस्तारातून समृद्धी शोधत शेती केली आहे.

शेती करताना घरातील सदस्य जर कष्ट करण्याची तयारीत असतील तर नफा-नुकसान सोसण्याची तयारी उपजत निर्माण होत असल्याचा आत्मविश्वास बेडसे ‘बंधूं’ना आहे. यंदा डाळिंब, सीताफळ, शेवगा व अन्य भाजीपाला पिकास पाणीटंचाईबरोबरच वाढत्या उन्हाचा तडाखा बसला आहे.

पाणी समस्या टोकाची

फळशेतीमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान नक्कीच उंचावले असले तरी शेती व्यवसाय बेभरवशाचा झाल्याने बागायतदार शेतकरी हतबल झाला आहे. कारण फळशेती करणे सध्या तरी प्रत्येकाला परवडणारे नाही. वातावरणातील बदल, वाढते तापमान आणि नैसर्गिक

संकटामुळे फळशेतीला फटका बसतो आहे. दुसरीकडे पिकविलेला माल विक्रीसाठी वेळेवर बाजारपेठेत नेणे वा खासगी व्यापाऱ्यांना बांधावर बोलावून देताना शेतकऱ्यांना नाकीनऊ येते. अशा वेळी पिकविणे सोपे व विकणे अवघड असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. यंदा पाणी समस्या टोकाची झाली आहे.

''मुबलक पाणी असले तर धाडसी शेतकरी शेतात सोनेही पिकवू शकतो, असे बुजुर्ग नेहमी सांगतात. पाण्याशिवाय शेती नाही हा यंदाचा अनुभव खूप शिकवून जाईल. पाणी काटकसरीने वापरणे हीच काळाची गरज आहे.''-गोरख साहेबराव बेडसे, फळबागायतदार शेतकरी, ककाणी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT