The only Gopal Milk Producers Co-operative Society in the district which provides Rs 6 lakh subsidy to the milk producing farmers of Malpur.
The only Gopal Milk Producers Co-operative Society in the district which provides Rs 6 lakh subsidy to the milk producing farmers of Malpur. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Milk Subsidy : दूध उत्पादक शेतकऱ्यांना 6 लाखांचे अनुदान

सकाळ वृत्तसेवा

दोंडाईचा : मालपूर (ता. शिंदखेडा) येथील गोपाल दूध उत्पादक सहकारी संस्थेच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाने जाहीर केलेले अनुदान प्राप्त झाले आहे. प्रतिलिटर दुधासाठी पाच रुपये अनुदान जाहीर करण्यात आले होते. त्यात गोपाल दूध उत्पादक संस्थेच्या संचालक मंडळाने सहभाग घेत दूध उत्पादक शेतकऱ्यांना सहा लाख रुपयांचे अनुदान मिळवून दिले आहे. त्यामुळे पशुपालकांमध्ये ऐन दुष्काळी परिस्थितीत दिलासा मिळाला आहे. (Dhule Subsidy of 6 lakhs to milk producing farmers)

सुमारे शंभर पशुपालकांना अनुदानाचा फायदा झाला. धुळे नंदुरबार जिल्ह्यातील अनुदान मिळविणारी गोपाल उत्पादक संस्था एकमेव ठरली आहे. राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला होता.

त्यानुसार जानेवारी, फेब्रुवारी २०२४ या महिन्यात गोपाल दूध उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्रावण आहिरे यांच्यासह सर्व संचालकांनी योजनेत सहभागी होण्यासाठी ठराव केला. त्यानुसार प्रतिलिटर दुधासाठी पाच रुपये अनुदान मिळणाऱ्या सर्व नियमांचे पालन केले. सभासदांना आवाहन करून सुमारे साडेतीनशेपेक्षा जास्त दुधाळ गायींचे ऑनलाइन टॅगिंग केले होते.

वेळेतच रजिस्ट्रेशन पूर्ण केले. त्यात पशुपालकांनी उत्साह दाखविला. दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने या अनुदानामुळे दुष्काळी परिस्थिती आर्थिक फायदा झाल्याचे समाधान व्यक्त केले जात आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अशाच अनुदान योजना शासनाने सुरू ठेवाव्यात, चारा-पाणीटंचाई काळात दुष्काळात २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळाले आहे. त्याचे खूप समाधान आहे, असे मत सर्वाधिक दूध घालणारे शेतकरी उत्तम भामरे, भटू रावल यांनी सांगितले.

यांचे लाभले सहकार्य

पशुसंवर्धन आयुक्त डॉ. मिलिंद भंडगे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी अमित पाटील, शेखर सकाळी, दीपक सिसोदे, दूध संस्थेचे सहसचिव गणेश वाघ यांचे सहकार्य लाभले

"ऐन दुष्काळी परिस्थितीत शासनाने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ पशुपालकांना मिळवून दिला आहे. सतत पाठपुरावा केल्याने यश मिळाले आहे. पशुवैद्यकीय विभाग, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे, संचालक मंडळाचे दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांचे सर्वतोपरी सहकार्य मिळाले आहे."

-श्रावण आहिरे, अध्यक्ष, गोपाल दूध उत्पादक सहकारी संस्था, मालपूर (ता. शिंदखेडा)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT