SP Shrikant Dhiware esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कुठल्याच प्रलोभनाला बळी पडू नका : एसपी श्रीकांत धिवरे

Dhule News : लाचप्रकरणी ‘एलसीबी’चा पोलिस निरीक्षक, दोन हवालदार अटकेत गेल्यानंतर व्यथित जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यंत्रणेची बैठक घेतली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : लाचप्रकरणी ‘एलसीबी’चा पोलिस निरीक्षक, दोन हवालदार अटकेत गेल्यानंतर व्यथित जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यंत्रणेची बैठक घेतली. तीत कुठल्याच प्रलोभनांना बळी पडू नये, लाच मागू नये, भ्रष्टाचार करू नये, अशी सक्त सूचना त्यांनी दिली. तसेच गटबाजी, श्रेयवाद, वर्चस्व वादाचे प्रकार घडू नयेत, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा श्री. धिवरे यांनी दिला. (Dhule Superintendent of Police Shrikant Dhiware held meeting)

येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एलसीबीचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, हवालदार नितीन मोहने, अशोक पाटील यांना दीड लाखाच्या लाच प्रकरणी अटक केली. या घटनेची गंभीर दखल घेत श्री. धिवरे यांनी त्यांच्या दालनात एलसीबीचे सर्व पोलिस अधिकारी, अंमलदार, तसेच जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांची तत्काळ बैठक घेतली. तीत त्यांची झाडाझडती घेत बहुमोल सूचना दिल्या.

भ्रष्टाचार करू नये

जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. कोणत्याही प्रकारचे बेकायदा कृत्ये करून लाच मागू नये, लाच देऊन भ्रष्टाचार करू नये. दैनंदिन कर्तव्य पार पाडताना कोणत्याही प्रकारे गटबाजी, श्रेयवाद व वर्चस्व वादाचे प्रकार करू नयेत. ते खपवून घेतले जाणार नाहीत. तसे आढळल्यास त्याची गंभीर दखल घेत कार्यवाही करण्यात येईल.

गंभीर दखल घेणार

गैरप्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस ठाणे व अन्य कार्यालयांमध्ये नेमणुकीस असलेले पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गुन्ह्यांच्या कामकाजावर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आणि त्यावरील सर्व नियंत्रक तसेच पर्यवेक्षक अधिकाऱ्यांनी योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. (latest marathi news)

सर्वांनी आपापली जबाबदारी नेटाने पार पाडावी. गैरप्रकारांसंबंधी वरिष्ठांना माहिती मिळाल्यास तथा तक्रार प्राप्त झाल्यास त्याची गंभीर दखल घेऊन कुणालाही पाठीशी न घालता संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी समज श्री. धिवरे यांनी उपस्थितांना बैठकीत दिली.

प्रतिमा मलिन होऊ नये

पोलिस अधीक्षक कार्यालयातील मंत्रालयीन कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारे लाच मागून भ्रष्टाचार करू नये, दप्तर दिरंगाईतून कामकाजातील हलगर्जी टाळावी. तसे आढळल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल. समाजात पोलिस दलाची प्रतीमा मलिन होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घ्यावी, अशी सूचनाही श्री. धिवरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Reservation: राज्य सरकारला मोठा झटका! ६७% ओबीसी आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

Ranji Trophy 2025 : अर्जुन तेंडुलकरच्या संघातून दोघांची द्विशतकं, गोवा संघाच्या ८ बाद ५५० धावा! सचिनच्या लेकाच्या यात किती धावा?

Stock Market Closing: शेअर बाजारात मोठी वाढ! फक्त दोन दिवसांत गुंतवणूकदारांनी कमावले 7 लाख कोटी

‘पारू’ व ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकांमध्ये होणार ‘या’ दोन लोकप्रिय कलाकारांची एन्ट्री; कोणत्या भूमिका साकारणार?

Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यापासून केवळ २७ प्रमाणपत्रांचं वाटप; सरसकट आरक्षण नाहीच, दिशाभूल कोण करतंय?

SCROLL FOR NEXT