Water flowing from Susri Dam. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Monsoon Season : सुसरी धरण ‘ओव्हरफ्लो’! नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

Dhule News : शहरापासून सात किलोमीटरवर असलेले सुसरी धरण पूर्ण क्षमतेने काठोकाठ भरल्याने सांडव्यातून पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे गोमाई नदीला मोठा पूर आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरापासून सात किलोमीटरवर असलेले सुसरी धरण पूर्ण क्षमतेने काठोकाठ भरल्याने सांडव्यातून पाणी ओसंडून वाहत आहे. त्यामुळे गोमाई नदीला मोठा पूर आला आहे. नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. शहादा तालुक्यात सुसरी धरण सर्वांत मोठे आहे. गेल्या दहा दिवसांपासून सातत्याने सातपुडा पर्वतरांगेत जोरदार पाऊस होत आहे. (Susri Dam Overflow Warning to riverside villages)

या पावसामुळे शहादा तालुक्यातील सर्वच लहान-मोठी धरणे तुडुंब भरली आहेत. आधीच वाकी नदीवरील दरा, चिरडे, राणीपूर ही धरणे काठोकाठ भरलेली होती. सुसरी नदीवरील धरण काठोकाठ भरलेले नव्हते.

मात्र गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्याने सुसरी धरण काठोकाठ भरले आहे. शंभर टक्के पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यातून पाणी ओसंडून बाहेर वाहत आहे. (latest marathi news)

सुसरी धरणाचा सांडवा शेजारीच असलेल्या गोमाई नदीपात्रात सोडलेला असल्याने आधीच गोमाई नदीला पूर आलेला आहे. त्यात सुसरी धरणाच्या सांडव्याचे पाणी आल्याने गोमाई नदीला मोठा पूर आला आहे.

पिंगाने, मनरद, लांबोळा, करजई, डामरखेडा, धुरखेडा या गावांतील नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संख्याबळ ३, तरीही लढणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक; केरळात भाजपने उमेदवार केला जाहीर

ST Fare Hike : लालपरी आर्थिक संकटात! एप्रिलमध्ये 76 कोटींचा तोटा अन् आता डिझेल थेट 91 पार; एसटीच्या तिकीट दरांबाबत मोठी अपडेट

Virat Kohli: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? बालपणीच्या प्रशिक्षकांच्या 'त्या' वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाची लाट

UPSC 2027 परीक्षा कॅलेंडर जाहीर! जाणून घ्या CSE, NDA, CDS, Engineering आणि CAPF परीक्षांच्या तारखा; विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट

स्टार प्रवाहची नवी जोडी! 'पाठराखीण'मध्ये गौरी इंगवलेसोबत दिसणार 'हा' डॅशिंग अभिनेता; तीन वर्षांनी करतोय पुनरागमन

SCROLL FOR NEXT