The appearance of a puddle in the Kapdane Talmatha Lake. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : तळमाथा तलावाला डबक्याचे स्वरूप; मे हीटचा तडाखा! कापडणेत पाणी फाउंडेशनने काढला होता गाळ

Dhule News : येथील नांद्रा फाटा रस्त्यालगत तळमाथा म्हणूस छोटा तलाव आहे. हा तलाव दुष्काळातही आटत नाही. त्याला तळपाणी असल्याचे सांगितले जाते. मात्र यंदाच्या दुष्काळाने तळ गाठला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : खानदेश मार्च आणि एप्रिल हीटनंतर आता मे हीटचा तडाका सहन करीत आहे. दुष्काळाच्या दाहकतेची झळ साऱ्यांनाच बसत आहे. मोठे पाण्याचे स्रोतही आटले आहेत. विहिरी व कूपनलिकांनी तळ गाठलाय. ऐन उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांची तहान भागविणाऱ्या ‘तळमाथा तलावाला’ डबक्याचे स्वरूप आले आहे. डबक्यातले पाणी दूषित झाले आहे. या तलावाचे खोलीकरण पाणी फाउंडेशन टीमने केले होते. (Dhule Talmatha Lake became puddle May heat rise)

येथील नांद्रा फाटा रस्त्यालगत तळमाथा म्हणूस छोटा तलाव आहे. हा तलाव दुष्काळातही आटत नाही. त्याला तळपाणी असल्याचे सांगितले जाते. मात्र यंदाच्या दुष्काळाने तळ गाठला आहे. येत्या आठ-दहा दिवसांत तलावातील डबकेही आटेल. तीव्र उष्णता आणि जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढलाय. परिणामी पाण्याचे स्रोत वेगाने आटत असल्याचे भागवत पाटील यांनी सांगितले.

तळमाथ्याचा काढलाय गाळ

२०१९ मध्ये पाणी फाउंडेशन टीमने या तळमाथ्यातील गाळ काढला होता. त्याचे खोलीकरण बरेच झाले होते. येथील गाळ शेतीसाठी उपयुक्त ठरला होता. मेच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा येथील गाळ काढणार असल्याचे फाउंडेशनचे प्रा. जगन्नाथ पाटील, नवल पाटील, दत्तात्रेय पाटील, जिभो पाटील, रामकृष्ण पाटील, जिजाबराव माळी, विठोबा माळी, दीपक बोरसे, अमोल बोरसे, संतोष एंडाईत आदींनी सांगितले. (Latest Marathi news)

लोकसहभाग वाढावा

धुळे जिल्हा तीव्र दुष्काळ अनुभवत आहे. दुष्काळाशी मुकाबला करण्यासाठी ग्रामपातळीवर ग्रामस्थांनी लोकसहभागातून गाळ काढण्याच्या कामासाठी पुढे आले पाहिजे, अशी अपेक्षा जाणकारांमधून व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT