उत्तर महाराष्ट्र

धुळे : पाणी चोरी प्रकरणी शेतकऱ्यास कारावास

सकाळ वृत्तसेवा

धुळे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीवरून पाणीचोरी केल्याने धमाणे (ता. धुळे) येथील शेतकऱ्याला येथील कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने कायम ठेवली. पाणी चोरी प्रकरणी संबंधित आरोपी शेतकऱ्याला एक वर्ष कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.
तापी पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीद्वारे धुळे शहराला पाणीपुरवठा होता. या जलवाहिनीवरून पाणीचोरी होत असल्याचे 9 फेब्रुवारी 2011 मध्ये निदर्शनास आले. महापालिकेचे तत्कालीन अभियंता सुनील श्रीधर देवरे हे 9 फेब्रुवारी 2011 ला सकाळी कर्मचाऱ्यांसोबत कामासाठी जात असताना ढंढाणे फाट्याजवळ रमेश अभिमन पाटील हे तापी योजनेवरील 965 एमएम व्यासाच्या जलवाहिनीवरील 200 मिमी वॉशआऊट वॉल उघडत असल्याचे निदर्शनास आले.
शेतकरी पाटील यांचा या कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला. मात्र ते पळून गेले. तपासणीत शेतकरी पाटील यांनी शेततळे केल्याचे आढळले. या तळ्यातून पाइपलाइनद्वारे शेताला पाणी दिले जात असल्याचेही आढळले. नंतर शेतकरी पाटील यांनी जलपरी व पाइपलाइन काढण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी 22 फेब्रुवारी 2011 ला शेतकरी पाटील यांच्याविरुद्ध सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. येथील जिल्हा न्यायालयातील कनिष्ठ न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने आरोपी शेतकरी पाटील यांना एक वर्षाचा कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. या निकालाविरुद्ध पाटील यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अपील केले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एच. सय्यद यांच्या न्यायालयात कामकाज चालले. त्यांनी आरोपी शेतकरी पाटील यांचे अपील फेटाळत कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली शिक्षा कायम ठेवली. या प्रकरणी सहाय्यक सरकारी वकिल गणेश पाटील यांनी कामकाज पाहिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT