Queue of citizens to pay property tax, water bill in municipal corporation on Sunday. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Tax Recovery : 3 दिवसांत तिजोरीत 2 कोटी 35 लाख; मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुली

Tax Recovery : वर्षाच्या शेवटच्या दिवशी रविवारी (ता. ३१) एकूण ९२ लाख ८९ हजार रुपये जमा झाले. अर्थात धनादेशातून मिळालेल्या रकमेचा यात समावेश झाल्यानंतर हा आकडा पुन्हा वाढण्याची शक्यता असेल.

सकाळ वृत्तसेवा

Dhule Tax Recovery : मालमत्ता कर व पाणीपट्टीतून महापालिकेच्या तिजोरीत चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी रविवारी (ता. ३१) एकूण ९२ लाख ८९ हजार रुपये जमा झाले. अर्थात धनादेशातून मिळालेल्या रकमेचा यात समावेश झाल्यानंतर हा आकडा पुन्हा वाढण्याची शक्यता असेल. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत महापालिकेच्या तिजोरीत एकूण दोन कोटी ३५ लाख रुपये जमा झाले. ()

मार्चअखेर असल्याने रविवारी (ता. ३१) सुटीचा दिवस असताना कर भरण्यासाठी महापालिकेत मालमत्ताधारकांच्या रांगा लागल्या होत्या. महापालिकेचा प्रमुख आर्थिक स्रोत असलेल्या मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाची गेल्या काही महिन्यांपासून कसरत सुरू होती.

मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याने ती वसूल व्हावी, थकबाकीदारांनाही दिलासा मिळून त्यांनी कर अदा करावा यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे-पाटील यांनी ३१ मार्चपर्यंत मालमत्ता करावरील शास्ती (दंड) शंभर टक्के माफ केला होता.

त्यातून जास्तीत जास्त कर संकलन होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शास्तीमाफी योजना जाहीर करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. दर वर्षीप्रमाणे मार्चअखेर जसजसा जवळ येत गेला तशी मालमत्ताधारकांची कर भरण्यासाठी गर्दी वाढू लागली. गेल्या आठवडाभरात ही गर्दी तुलनेने वाढल्याचे पाहायला मिळाले.

त्यामुळे ३१ मार्चअखेर किती करवसुली झाली याकडे लक्ष होते. अर्थात एकूण वसुलीचा आकडा अधिकाऱ्यांकडून मिळाला नाही. ऑनलाइन भरणा, प्रत्यक्ष भरणा, धनादेश आदींची एकत्रित माहिती जमा झाल्यानंतरच अंतिम आकडेवारी सांगता येईल, असे अधिकारी म्हणाले. असे असले तरी ४०-४५ कोटीपर्यंत करवसुलीची अधिकाऱ्यांना अपेक्षा आहे.(latest marathi news)

पाणीपट्टीची स्थिती अशी

मालमत्ता करापेक्षा पाणीपट्टी वसुलीचीही मोठी डोकेदुखी आहे. दर वर्षी अपेक्षित पाणीपट्टी वसूल होत नाही. यंदाही तसेच चित्र दिसते. गेल्या तीन दिवसांतील पाणीपट्टी वसुलीची आकडेवारी पाहता केवळ १३-१४ लाख रुपये पाणीपट्टी वसूल झाली आहे.

तीन दिवसातील करवसुली

-२९ मार्च ः मालमत्ता कर- ६५,०५,११३, पाणीपट्टी- ४,२३,७८८, एकूण- ६९,२८,९०१

-३० मार्च ः मालमत्ता कर- ६८,७१,७१०, पाणीपट्टी- ४,३७,५१७, एकूण- ७३,०९,२२७

-३१ मार्च ः मालमत्ता कर- ८७,५०,३७५, पाणीपट्टी- ५,३८,९३९, एकूण- ९२,८९,३१४

-तीन दिवसांत एकूण वसुली ः दोन कोटी ३५ लाख २७ हजार ४४२ रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Slab Proposal: कररचनेत ऐतिहासिक बदल! आता जीएसटीत फक्त दोनच दर, केंद्राचा प्रस्ताव मंजूर

Explainer: 'गाझा'वर ताबा मिळवण्यासाठी इस्रायल तयार; पण २० वर्षांपूर्वी सैनिकांना माघारी बोलावण्याची आली होती वेळ

Vajrasana Benefits: जेवल्यावर लगेच करता येणारे एकमेव आसन! जाणून घ्या वज्रासनाचे जबरदस्त फायदे

Charging Port Repair Tips : मोबाइल चार्ज होत नाही? घरच्या घरी 'या' सोप्या ट्रिकने दुरुस्त करा पोर्ट, बघा एका क्लिकवर

Trump Tariff: ट्रम्प टॅरिफचा फटका अमेरिकेलाच बसला! 446 कंपन्या दिवाळखोर; बेरोजगारीही वाढली

SCROLL FOR NEXT