congress and bjp  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Assembly Constituency: आमदारकीसाठी भाजपची वाट काहीशी खडतर! हिंदुत्वाच्या मुद्द्याची नीटनेटकी मांडणी झाली तर फलश्रुती

Assembly Constituency: दुर्लक्ष करत राजकारण केले जात असल्यामुळे सुज्ञ धुळेकरही निवडणुकीचा निकाल बरोबर बदलवत असतात.

निखिल सूर्यवंशी

Dhule Assembly Constituency : विकासासह आर्थिक प्रगतीसाठी झुंजणाऱ्या धुळे शहरात शांतता नांदावी, नियमित पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, रोजगारनिर्मिती व्हावी, तसेच जळगाव, नंदुरबार, नाशिक शहरासारखा विकास व्हावा, अशी धुळेकरांची माफक अपेक्षा असते. तिच्याकडे दुर्लक्ष करत राजकारण केले जात असल्यामुळे सुज्ञ धुळेकरही निवडणुकीचा निकाल बरोबर बदलवत असतात. त्याची प्रचीती लोकसभेच्या धुळे मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालावरून येत आहे. ( tone is emerging on political stage that BJP wait for MLA has become somewhat tough )

त्यामुळे आमदारकीसाठी भाजपची वाट काहीशी खडतर झाल्याचा सूर राजकीय पटलावर उमटत आहे. अनेक कॉलन्या वर्षानुवर्षे रस्ते, विजेअभावी वंचित, जळीस्थळी कचऱ्यासह अस्वच्छता, त्यात मोकाट जनावरांची भर, सात-आठ दिवसांनी पिण्याच्या पाण्याचा अनियमित पुरवठा, भूमिगत गटारीचे रखडलेले काम, पांझरा चौपाटीलगत कोट्यवधींच्या निधीतून उद्यान विनावापर पडून, प्रमुख वर्दळीच्या रस्त्यांची दयनीय स्थिती, दुतर्फा वाढती अतिक्रमणे.

पार्किंगची समस्या आणि दूरदृष्टिकोनाअभावी हॉकर्सचा भिजत पडलेला प्रश्‍न, कामांमधील निकृष्टपणाची समस्या, महापालिकेत बेबंदशाही आणि भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याची टीका, शिरपूरप्रमाणे एका चांगल्या गार्डनचा अभाव, गुंडगिरी आणि अवैध व्यवसायांना खतपाणी घालण्यात स्वारस्य आदी स्थितीत अडकलेल्या धुळे शहरातील या समस्यांची सोडवणूक करण्यापेक्षा हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे धुळेकरांचे लक्ष वेधले जात असल्याचे चित्र दिसते.

जीवनमरणाचे प्रश्‍न दुर्लक्षित

धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नागरिकांचे जीवनमरणाशी निगडित प्रश्‍न दुर्लक्षित राहिल्याने त्याचा फटका निकालाच्या रूपाने भाजपला सोसावा लागल्याचे मानले जाते. धुळे शहराच्या प्रगतीआड येणाऱ्या या प्रमुख समस्यांवर ठोस तोडगा काढू, अशी हमी निवडणुकीच्या प्रचारातून भाजपकडून मिळू शकली नाही. त्यामुळे बहुतांश नाराज मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरविल्याचे म्हटले जाते. (latest marathi news)

मुळात कोरोनासारख्या महामारीनंतर धुळे शहराची विस्कटलेली आर्थिक घडी आता कुठे नीटनेटकी बसू लागली आहे. त्यात एखाद्या मुद्द्यावरून शहरात अशांतता किंवा दंगलीसारखा अनुचित प्रकार घडण्याची भीती निर्माण होत असेल तर त्याचा परिणाम मतदान प्रक्रियेवर आणि निवडणुकीच्या निकालावरही होत असतो. त्याची छटा धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या निकालातून अधोरेखित झाल्याचा निष्कर्ष एव्हाना काढला जात आहे.

आत्मचिंतनाची आली वेळ

धुळे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतदारांचा कौल हा काँग्रेसकडे का झुकला आणि अधिकाधिक विकास निधी देणाऱ्या भाजपच्या विरोधात का गेला यावर स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांना आत्मचिंतन करावे लागणार आहे. त्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्याची नीटनेटकी मांडणी करून विधानसभा निवडणुकीवेळी मतदारांपुढे जावे लागणार आहे. तसे झाले तर धुळे शहरात आमदारकीसाठी खडतर झालेली भाजपची वाट पुढे सुकर होऊ शकेल.

कुठल्याही शहराचा विकास हा विशिष्ट एखाद्या राजकीय अजेंड्यावरील मुद्द्याआधारे किंवा केवळ विकास निधी आणून होत नसतो, तर त्याजोडीला शांतता नांदणे, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहणे, गुंडगिरी व गुन्हेगारीला पोलिसांच्या माध्यमातून वेसण घालणे, व्यापारउदीम वृद्धिंगत होणे, बेरोजगारांच्या हाताला काम मिळणे, शहराच्या सुयोग्य नियोजनावर अवलंबून असतो. या कसोटीला कुठला राजकीय पक्ष, नेता उतरला आणि त्याच्या हाती अधिकाधिक काळ शहर विकासाची दोरी मतदारांनी सोपविली याचे उत्तर शोधण्याची गरज व्यक्त होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फडणवीसांना अडचणीत आणायला जरांगेंना रसद पुरवताय का? शिंदे म्हणाले, मी लपून-छपून काही करत नाही

Chhagan Bhujbal : ओबीसी नेत्यांची आज मुंबईत बैठक, मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून आयोजन; जरांगेच्या मागणीला विरोध

राज्य सरकार घेणार ‘हे’ 2 मोठे निर्णय! 5 वर्षांत थकबाकीदार नसलेलाच यापुढे ग्रामपंचायत निवडणुकीस पात्र; ग्रामपंचायतीचा एकरकमी कर भरल्यास मिळणार 50 टक्के माफी

JP Nadda: गणेश उत्सवात शहराला भेट देणं माझं भाग्य, केंद्रीय मंत्री मुंबईतील गणरायाच्या चरणी नतमस्तक

Hotel Bhagyashree : जरांगेंचं आंदोलन सुरु असेपर्यंत हॉटेल भाग्यश्री बंद; आंदोलकांसाठी ट्रकभर शिधा मुंबईला पाठवला...

SCROLL FOR NEXT