Police officer Bhushan Kote and team present during inspection after confiscation of bullet silencer. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : वाहतूक शाखेने बुलेटस्वारांचा कर्णकर्कश आवाज केला बंद; 35 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई

Dhule : शहर वाहतूक पोलिस शाखेने बुधवारी (ता.२६) शहरातील बुलेटस्वारांचा कर्णकर्कश आवाज बंद केला.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहर वाहतूक पोलिस शाखेने बुधवारी (ता.२६) शहरातील बुलेटस्वारांचा कर्णकर्कश आवाज बंद केला. यात ३५ वाहनधारकांवर कारवाई करीत सायलेन्सर जप्त केले. तसेच त्यांच्याकडून ३५ हजारांचा दंड वसूल केला. शहरात बुलेटला विचित्र सायलेन्सर लावत कानठळ्या बसविणाऱ्या कर्णकर्कश आवाजाच्या वाहनचालकांची संख्या वाढली आहे. त्याचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. ते लक्षात घेत शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते व पथकाने बुधवारी (ता.२६) सकाळी नऊ ते दुपारी एकपर्यंत शहरात विविध ठिकाणी विशेष तपासणी मोहीम राबविली. ( traffic branch stopped shrill sound of bullet riders )

कठोर कारवाईची गरज

शहरातील जयहिंद ज्युनिअर कॉलेज परिसर, दत्त मंदिर चौक, महाजन हायस्कूल, संतोषीमाता चौक, बारापत्थर, मामलेदार कचेरी चौक आदी वर्दळीच्या ठिकाणी ही मोहीम राबविण्यात आली. बुलेटच्या सायलेन्सरची तपासणी केली. त्यात एकूण ३५ वाहनधारकांनी त्यांच्या वाहनास कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसविल्याचे आढळले. त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई केली.

तसेच त्यांच्याकडून ३५ हजारांचा दंड वसूल केला. या प्रकरणी कठोर कारवाईत सातत्य ठेवण्याची नागरिकांची मागणी आहे. पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. बुलेटधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. सायलेन्सरमध्ये कोणताही अनावश्यक बदल करू नये, असे आवाहन कोते यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : जुगाराचे उलटे दान

Chh. Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरात गणेश मंडळाच्या मंडप उभारणीच्या वादातून तुफान हाणामारी; तिघा भावांकडून हल्ला, एकाचा मृत्यू

आजचे राशिभविष्य - 23 ऑगस्ट 2025

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २३ ऑगस्ट २०२५ ते २९ ऑगस्ट २०२५ - मराठी राशी भविष्य

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 23 ऑगस्ट 2025

SCROLL FOR NEXT