Vilas Pawar's banana garden was destroyed in Humbarde Shiwar. In the second photograph, Laxman Koli's lemon tree was uprooted by a storm. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Unseasonal Rain Damage : शिंदखेड्यात लिंबू, केळीची बाग भुईसपाट! वादळी वाऱ्याचा फटका

Dhule News : वालखेडा (ता. शिंदखेडा) शिवारात शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे एका शेतकऱ्याची बहरलेल्या लिंबूच्या बागेतील १८ ते २० वृक्ष उन्मळून पडले.

सकाळ वृत्तसेवा

चिमठाणे : वालखेडा (ता. शिंदखेडा) शिवारात शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे एका शेतकऱ्याची बहरलेल्या लिंबूच्या बागेतील १८ ते २० वृक्ष उन्मळून पडले. तर हुंबर्डे येथील शेतकऱ्याची केळीची बाग भुईसपाट झाली. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. (Dhule Unseasonal Rain Damage Lemon banana orchard in Sindkheda collapse)

शासनाने लवकरात लवकर पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शिंदखेडा तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून ऊन-सावलीचा खेळ सुरू आहे. तालुक्यात शुक्रवारी दुपारी काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुरळक पाऊस झाला.

वालखेडा शिवारातील लक्ष्मण पांडुरंग कोळी यांच्या शेतातील लिंबूंची जवळपास १८ ते २० झाडे उन्मळून पडली आहेत. तर हुंबर्डे येथील विलास पवार यांची तयार झालेली केळीची बाग भुईसपाट झाल्याने आर्थिक नुकसान झाले. (latest marathi news)

शनिवारी (ता. १३) सकाळी तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर, कृषी मंडळ अधिकारी आर. डी. मोरे, महसूल मंडळ अधिकारी स्वाती कोळी, कृषी पर्यवेक्षक पी. जे. पाटील, तलाठी किशोर बडगुजर, कृषी सहाय्यक पी. ओ. राजपूत यांनी नुकसानग्रस्त फळबागेची पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi NIA Custody : अनमोल बिश्नोईला ११ दिवसांच्या NIA कोठडी!, पटियाला हाऊस कोर्टाचा निर्णय

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

SCROLL FOR NEXT