shivsena shinde group & BJP esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Vidhan Sabha Election 2024: धुळे शहराची जागा शिवसेना शिंदे गटाला! भाजपच्या गोटात चिंता; विविध समीकरणे बदलण्याची चिन्हे

Latest Vidhan Sabha Election 2024 News : भाजपने सुरू केलेल्या सर्वेक्षण आणि इच्छुकांमधून अंतिम उमेदवार निवडीच्या प्राथमिक प्रक्रियेत धुळे शहर, साक्री मतदारसंघ वगळला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाला ही जागा जाईल, असे ठळक चित्र समोर येत आहे.

निखिल सूर्यवंशी

Dhule Vidhan Sabha Election 2024 : केंद्र आणि राज्यात भाजपप्रणीत सरकार असल्याने त्यावर भारी भरणाऱ्या या पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विधानसभा निवडणुकीतील इच्छुकांना चिंतेत टाकणाऱ्या घडामोडी घडत आहेत.

भाजपने सुरू केलेल्या सर्वेक्षण आणि इच्छुकांमधून अंतिम उमेदवार निवडीच्या प्राथमिक प्रक्रियेत धुळे शहर, साक्री मतदारसंघ वगळला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाला ही जागा जाईल, असे ठळक चित्र समोर येत आहे. (Vidhan Sabha Election 2024 city seat to Shiv Sena Shinde group)

महायुती, महाआघाडीतील सत्तासंघर्षाचा परिणाम धुळे शहरासह जिल्ह्यातील राजकारणावर झाला आहे. लोकसभा निवडणुकीवेळी त्याचे परिणाम महायुतीला दिसून आले. मतदारांनी धुळे मतदारसंघ काँग्रेसकडे सोपविला. या धक्क्यातून सावरताना स्थानिक भाजपवासियांनी धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची जागा आपण लढवू आणि त्यादृष्टीने नियोजनात्मक कामकाज करू, असा निर्धार करीत वातावरण निर्मितीला सुरुवात केली आहे.

तीन मतदारसंघात प्रक्रिया

धुळे शहर मतदारसंघात भाजपकडून माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शहर विधानसभा क्षेत्रप्रमुख अनुप अग्रवाल, माजी महापौर प्रदीप कर्पे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. माधुरी बोरसे यांची नावे चर्चेत आहेत. या सर्व इच्छुकांनी दोन महिन्यांपासून प्रचारही सुरू केला आहे.

असे असताना भाजपने एक ऑक्टोबरला एकाच वेळी राज्यभरात पक्षीय निरीक्षक पाठवून पहिल्या तीन पसंतीच्या इच्छुक उमेदवारांसाठी पदाधिकाऱ्यांचे मतदान घेतले. यात भाजपने जिल्ह्यात धुळे ग्रामीण, शिंदखेडा, शिरपूर मतदारसंघासाठी ही प्रक्रिया राबविली. यासंबंधी पक्षीय यादीत धुळे शहर मतदारसंघ वगळल्याने स्थानिक भाजपवासिय चिंतेत पडले आहेत. (latest marathi news)

उलथापालथ शक्य

गेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात ज्या- ज्या मतदारसंघातील जागा आपण लढविल्या, त्याच मतदारसंघात यंदा सर्वेक्षण आणि इच्छुकांमधून अंतिम उमेदवाराची निवड, मुलाखतीची प्रक्रिया राबविण्याचे धोरण भाजपने स्वीकारले आहे. त्यानुसार गेल्या निवडणुकीवेळी धुळे शहराची जागा ही भाजप युतीतील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असताना हिलाल माळी यांनी लढविली होती.

त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपच्या छुप्या मदतीच्या बळावर नशीब अजमावणारे बंडखोर राजवर्धन कदमबांडे रिंगणात होते. त्यांच्यासह श्री. माळी यांना पराभव पत्करावा लागला. निवडणुकीतील राजकीय दगाफटक्यात `एमआयएम`ला शहरात आमदारकीची संधी मिळाली. यात शिवसेना शिंदे गटाला धुळे शहराची जागा मिळाल्यास राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ होण्याची अधिक शक्यता असेल.

जागेवर दावा अन्‌ रोचक घडामोडींकडे लक्ष

धुळे शहर मतदारसंघाची जागा गेल्या वेळी भाजपऐवजी शिवसेनेने लढविल्याने आताच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे भाजपच्या निरीक्षक यादीत धुळे शहर मतदारसंघ वगळण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेना शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुख मनोज मोरे व सतीश महाले इच्छुक असताना महापालिका स्थायी समितीचे माजी सभापती शीतलकुमार नवले यांना शिंदे गटाकडून ‘ऑफर' असल्याची चर्चा लपून राहिलेली नाही. शिवसेना शिंदे गटाकडून निवडणुकीसाठी उमेदवार आयात केला जातो की पक्षातील एखाद्या इच्छुकास संधी दिली जाते, शिंदे गटाला जागा सुटल्यास भाजपची भूमिका काय असेल हे पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

MLA Prakash Solanke : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला प्रकाश सोळंके यांचा पाठिंबा; सोशल मीडियावर 'मी येतोय तुम्ही या'चे आवाहन

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

SCROLL FOR NEXT