Protesters of 'Vihimp' during protest against road issue. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : 'विहिंप'चे टाळ वाजवित आंदोलन; धुळ्यातील सार्वजनिक रस्ता खुला करण्याकडे वेधले लक्ष

Dhule : रस्त्याची स्वच्छता करुन तो वाहतुकीसाठी खुला करावा, या मागणीसाठी विश्‍व हिंदू परिषदेच्या आंदोलकांनी शुक्रवारी (ता. १) टाळ वाजवित आंदोलनातून लक्ष वेधले.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील फुलवाला चौक ते गांधी पुतळा या गजबजलेल्या रस्त्याच्या समांतर असलेला शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या भिंतीलगतचा रस्ता घाणीच्या साम्राज्याने बाधित झाला आहे. या रस्त्याची स्वच्छता करुन तो वाहतुकीसाठी खुला करावा, या मागणीसाठी विश्‍व हिंदू परिषदेच्या आंदोलकांनी शुक्रवारी (ता. १) टाळ वाजवित आंदोलनातून लक्ष वेधले. (Dhule Vihimp movement Attention was drawn to opening of public roads)

आंदोलकांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फुलवाला चौक ते महात्मा गांधी पुतळ्याला समांतर असणारा शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाच्या भिंतीलगतचा रस्ता घाणीच्या साम्राज्यात आहे.

त्यामुळे परिसरातील व्यापारी, रहिवासी व शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयातील निवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या रस्त्यावर अनेक अवैध व्यवसायही चालतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. (latest marathi news)

या रस्त्याची स्वच्छता करावी, पथदिवे लावावे आणि जनतेला वाहतुकीसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे. आंदोलनात `विहिंप`चे शहराध्यक्ष निलेश रुणवाल, महानगर मंत्री उमेश चौधरी, जिल्हाध्यक्ष योगीराज मराठे, राहुल खिलोसिया, अरुण नानकर, राजेंद्र खंडेलवाल, लोकेश चौधरी, अमोल जाधव, निखिल बडगुजर, सचिन मराठे.

प्रकाश बर्डिया, प्रदीप दीक्षित, विनायक बडगुजर, मुकेश लुंड, महादेव पाटील, निलेश रायते, नितीन पाटील, विनोद सोमानी, विठ्ठल कबाडे, रामेश्‍वर ठाकूर, प्रवीण कोळी, कुणाल जाधव, धीरज जैन, विजय महाजन, आशिष पेडवाल.

लक्ष्मण माळी, स्वप्नील शिंदे, संतोष चौधरी, विशाल विसपुते, गुलाब माळी, नितेश परदेशी, लोकेश बडगुजर, अमोल भागवत, राहुल चौधरी, राजू महाराज, राहुल अहिरराव आदी सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs MI Live: पुण्याच्या पोराने कमाल केली! आधी अफलातून झेल टिपला, नंतर सूर्यकुमार यादवची विकेट घेत दिला तगडा झटका Video

Indapur Accident : इंदापूरमध्ये भरधाव कारचा थरार; झाडाखाली उभ्या तीन वाहनांना धडक

Akola Crime : ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत अकोल्यात अवैध शस्त्रविक्रीवर धडक; ३ आरोपी अटकेत, २.२२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुण्यातील नवले पूलावर रास्तारोको; मोठी वाहतूक कोंडी, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Who is Ramakrishna Ghosh? नाशिकचा जन्म, पुण्यात गिरवले क्रिकेटचे धडे... CSK कडून आणखी एका महाराष्ट्रीय खेळाडूचे पदार्पण

SCROLL FOR NEXT