Tushar Mahale, Vikas Jadhav, Deva Pakle looking at a place to carve a pit for water in the dry Lalbardi dam. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Water Crisis : काही तुपाशी, तर बाकी उपाशी; मुख्य जलवाहिनीच्या अनधिकृत जोडण्या तत्काळ बंद करा : तुषार महाले

अनधिकृत नळजोडणी असल्याने सात दिवसांनी होणाऱ्या पाणीपुरवठ्याने काहींना मुबलक पाणी मिळते, तर सामान्य नागरिकांना पाणीच मिळत नसल्याने लामकानीत भीषण पाणीटंचाईत ‘काही तुपाशी, तर बाकी उपाशी’ अशी परिस्थिती.

खेमचंद पाकळे

लामकानी : येथील गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच दुकानांची व घरांची अनधिकृत नळजोडणी असल्याने सात दिवसांनी होणाऱ्या पाणीपुरवठ्याने काहींना मुबलक पाणी मिळते, तर सामान्य नागरिकांना पाणीच मिळत नसल्याने लामकानीत भीषण पाणीटंचाईत ‘काही तुपाशी, तर बाकी उपाशी’ अशी परिस्थिती. (Dhule Water Crisis Tushar Mahale statement Immediately stop unauthorized connection of water mains)

निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केल्यानंतर पंचायत समिती सदस्य तुषार महाले यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला अनधिकृत नळजोडण्या तत्काळ बंद करून ठराविक लोकांचे लाड थांबविण्याच्या सूचना दिल्या. पावसाळाच कमी झाल्याने या वर्षी कधी नव्हे एवढ्या भीषण पाणीटंचाईला लामकानी गाव सामोरे जात आहे. पाणीपुरवठा करणारे लालबर्डी धरण पूर्णता आठले असून.

धरणाजवळील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून गावविहीर आणि पाणी टाकीत पाणीपुरवठा केला जातो. मात्र काहींनी याच मुख्य जलवाहिनीलाच सरळ अनधिकृत नळजोडणी करून घेतल्याने जेव्हा हे पाणी पाइपात येते तेव्हा ठराविक लोकांनाच पाणी मिळते आणि बाकीच्या नळांना थेंबभरही पाणी येत नसल्याने ग्रामस्थांनी मोठा संताप व्यक्त केला. यावर पंचायत समिती सदस्य महाले यांनी ग्रामसेवक विकास जाधव यांना सूचना दिल्या असून, ठराविक लोकांचे लाड बंद करण्यास सांगितले. (latest marathi news)

"गावासाठी पाणीपुरवठ्याचे सर्वच स्रोत आटले आहेत. धरण कोरडे झाले. प्रयत्नांची पराकाष्ठा करत ग्रामपंचायत प्रशासन पाणीपुरवठा सुरळीत करत आहे. मात्र काहींनी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीलाच अनधिकृत नळजोडणी करून गावाच्या हिश्शाचे पाणी स्वतःसाठी मर्यादेत ठेवले असून, ग्रामस्थांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. अनधिकृत नळजोडणी तत्काळ बंद करून फालतू लाड थांबविण्याच्या सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या आहेत." -तुषार महाले, पंचायत समिती सदस्य

"अनेकांनी अनधिकृत नळजोडणी केली असून, पाणीपुरवठ्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. भीषण पाणीटंचाई लक्षात घेत प्रशासनाच्या सक्त आदेशानुसार प्रत्येक नागरिकाला पाणी उपलब्ध झाले पाहिजे म्हणून अनधिकृत नळजोडणी लवकरच बंद करण्यात येईल व गावाचा हक्काचा पाणीपुरवठा सुरळीत होईल." -विकास जाधव, ग्रामविकास अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT