Kapdane Young people bring water with bullocks as there is no water in the taps in village street esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Water Scarcity : कापडणेकर पाण्याविना कासावीस; 6 दिवसांआड पाणीपुरवठा

Dhule Water Scarcity : पाणीपुरवठा करणाऱ्या देवभाने धरणात मृत जलसाठा शिल्लक राहिला आहे. येथून पाणीपुरवठा बंद झाला आहे.

जगन्नाथ पाटील : सकाळ वृत्तसेवा

कापडणे : येथे पाणीपुरवठा करणाऱ्या देवभाने धरणात मृत जलसाठा शिल्लक राहिला आहे. येथून पाणीपुरवठा बंद झाला आहे. बिलाडी रस्त्यालगतच्या कूपनलिकांची पाणीपातळी कमालीची खालावली आहे. सहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे, तर काही भागांमध्ये तब्बल बारा दिवस उलटल्यानंतरही नळांना पाणी पोचलेले नाही. ग्रामपंचायतीने पाणीपुरवठ्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. (Dhule Water Scarcity Water supply in kapadne every 6 days)

येथील लोकसंख्या वीस हजारांवर आहे. गाव चारही दिशांना विस्तीर्ण पसरलेले आहे. विविध नगरांमुळे तर गावाचे क्षेत्रफळ वाढले आहे. गावाचा परीघ चार किलोमीटरपेक्षा जास्त आहे. जुन्यासह नव्या भागांमध्ये पाणीपुरवठा करणे, मोठ्या जिकिरीचे झाले आहे. येथील पाण्याचे मुख्य स्रोत आटले आहेत. येथून साडेपाच किलोमीटरवर देवभाने धरण आहे.

येथून पाणीपुरवठा होतो. धरणात आता मृत जलसाठा शिल्लक आहे. येथून पाणीपुरवठा पूर्णतः बंद झाला आहे. याचा पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. बिलाडी रस्त्यालगत असलेल्या कूपनलिकांमधूनही सातत्यपूर्ण पाणीपुरवठा होत असतो. या कूपनलिकांची पाणीपातळीही खोल गेली आहे. याचाही पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. आता नळांना सहा सात दिवसांआड पाणीपुरवठा होऊ लागला आहे. (latest marathi news)

काही भागांत पाणीच नाही

गावपोळ गल्लीसह बऱ्याचशा भागात पूर्ण दाबाचा पाणीपुरवठा होत नाही. काही भागांत दहा दिवसांनंतरही पाणी पोचत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. पूर्ण दाबाने पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याची अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

नव्या कूपनलिकेत केव्हा वीजपंप टाकणार?

भात नदीत नव्याने कूपनलिका खोदली आहे. तिला बऱ्यापैकी पाणी लागले आहे. आठ दिवस झाले, तरीही कूपनलिकेत वीजपंप टाकण्यात आलेला नाही. या कूपनलिकेत तत्काळ वीजपंप टाकावा. पाण्याची सोय करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

"गेल्या चौदा दिवसांपासून आमच्या गल्लीतील नळांना पाणी आलेले नाही. पाण्याविना आम्ही कासावीस झालो आहोत. जलवाहिनी बदलणे गरजेचे आहे."-महेंद्र पाटील, ग्रामस्थ, कापडणे

"गावपोळ गल्लीत सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिनी बदलण्याचे काम सुरू आहे. लवकरच सुरळीत पाणीपुरवठा होईल."-ग्रामपंचायत पदाधिकारी, कापडणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT