Bridegroom and bridegroom leaving on bullock cart esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Wedding Ceremony : ना घोडा ना बग्गी; आमची ग्रेट बैलगाडी! बैलगाडीवरून शेतकरी वर-वधूची वरात

Dhule News : एका नवरदेवाने बैलगाडीवरूनच वराती काढली. त्याच्या नववधूनेही त्याच्यासोबत सहभागी होत शोभा वाढविली.

जगन्नाथ पाटील

कापडणे : विवाह म्हटला म्हणजे रुसवेफुगवे आलेच. मानपानाशिवाय विवाहच पूर्ण होऊ शकत नाही. वरातीसाठी घोडा नसेल तर आकांडतांडव करणाऱ्या वराची व वऱ्हाडींची कमी नाही. पण एका नवरदेवाने बैलगाडीवरूनच वराती काढली. त्याच्या नववधूनेही त्याच्यासोबत सहभागी होत शोभा वाढविली. या वरातीत सहभागी युवकांनी मोठा जल्लोष केला. या वरातीची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे. नवरदेवाचे नाव मोठ्या आदराने घेतले जात आहे. (Dhule Wedding Ceremony news)

हातनूर (ता. धुळे) येथील वैभव जगताप व तळेगाव येथील हेतल जाधव यांचा विवाह मोठ्या थाटामाटात झाला. दोन्ही शेतकऱ्याची लेकरे आहेत. वैभव हा युवा शेतकरी आहे. आई-वडीलही शेतकरी आहेत. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत उत्कृष्ट शेती सांभाळत आहेत. नोकरीच्या मागे न धावता शेतीसह गायी-म्हशी सांभाळून उत्कृष्ट शेती व्यवसायात रुजला आहे.

चांगली कमाईही काढीत आहे. वैभव हातनूर येथील प्रगतशील शेतकरी व वारकरी संप्रदायातील देवीदास जगताप यांचा मुलगा आहे, तर हेतल तळेगाव येथील राजेंद्र जाधव यांची कन्या आहे. दरम्यान, वैभवच्या या अभिनव वरातीचे पोलिसपाटील युवराज माळी, पिंटू पाटील आदींनी पुष्पगुच्छ भेट देऊन कौतुक केले. (Latest Marathi News)

"मला शेतकरीपुत्र असल्याचा अभिमान आहे. शेतीवर आई-वडिलांनी उत्पन्न काढून संसाराचा गाडा सांभाळलाय. मी त्याच शेतीतून चांगले उत्पन्न घेऊन समाधानी आहे. शेतीत राबराब राबून मला मोलाची साथ देत आहेत त्या सर्जाराजाच्या बैलगाडीवरून वरात काढण्याची इच्छा पूर्ण केली."- वैभव जगताप, नवरदेव, हातनूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 विश्वचषक 2026 प्रसारणावरून गोंधळ; ICCचा मोठा खुलासा, JioStar करार मोडल्याच्या अफवा फेटाळल्या

UPSC Exam: ‘यूपीएससी’चा मोठा निर्णय! 'या' उमेदवारांना मिळणार सोयीनुसार परीक्षा केंद्र

Pune Marathon : मॅरेथॉन दिवशी विद्यापीठात वाहनबंधी; धावपटूंसाठी विशेष शटल बस व पार्किंगची स्वतंत्र सोय!

Santosh Deshmukh Case: मारहाणीचे २३ व्हिडीओ अन् संतोष देशमुखांच्या पत्नी कोर्टाबाहेर धावल्या; वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

Hadapsar Accident : पुणे–सोलापूर महामार्गावर भरधाव वाहनाची धडक; दोन वेगवेगळ्या अपघातांत दोन बळी

SCROLL FOR NEXT