Deepening of submerged spring by JCB machine in old village forest area. A herd of monkeys came to a spring to drink water.
Deepening of submerged spring by JCB machine in old village forest area. A herd of monkeys came to a spring to drink water. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : ‘झऱ्या’तील जलसाठ्याचा वन्यपशूंना मिळतोय ‘आधार’! काळगाव वनक्षेत्रात बुजलेले झरे पुनरुज्जीवीत

दगाजी देवरे

म्हसदी : यंदा तीव्र पाणीटंचाईमुळे वन्य पशू- पक्ष्यांची प्रचंड घालमेल होत आहे. काळगाव (ता. साक्री) येथील जुना गाव वनक्षेत्रात पिंपळनेर वनविभाग, काळगाव संयुक्त वनव्यवस्थापन समिती व ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून बुजलेल्या झऱ्यांचे जेसीबीद्वारे खोलीकरण करत नव्याने अल्प का होईना जलसाठा उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे वन्यपशूंची तहान भागणार आहे. (Dhule Wild animals get water from stream reservoir Kalgaon forest area news)

सुमारे नऊ वर्षांपूर्वी जलयुक्त शिवार अभियानात काळगाव वनक्षेत्रात वाहून जाणारे पाणी अडविण्याची कामे झाली होती. जुन्या गावठाण वनक्षेत्रात वर्षभर पाण्याचा जलस्रोत टीकून राहतो. अल्प पावसामुळे यंदा कधी नव्हे ते झरे कोरडेठाक पडले होते. येथील झरा कोरल्यास जलसाठा उपलब्ध होऊ शकतो, असा अंदाज संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी व आदिवासी बांधवांनी बांधला.

पिंपळनेर वनविभागाच्या सहकार्याने संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय भामरे, उपाध्यक्ष पठाण सोनवणे, फुलसिंग अहिरे, लाला अहिरे, सोनू सोनवणे, शिवाजी सोनवणे, नंदू सोनवणे यांच्यासह आदिवासी बांधवांनी या कामासाठी कंबर कसली.

जेसीबीद्वारे काम सुरू असताना एरवी वर्षभर पाणी असणाऱ्या पण दुष्काळामुळे सध्या कोरड्याठाक झऱ्याचे खोलीकरण केल्याने पाणी आढळल्याने समितीच्या पदाधिकाऱ्यांना आनंद झाला. अल्प का असेना पण ऐन उन्हाळ्यात पाणी उपलब्ध झाल्याने वन्यपशूंना दिलासा मिळाला आहे.  (latest marathi news)

जलयुक्त शिवार अभियानाचे फलीत

शासनाची जलयुक्त शिवार अभियान योजना पाणीटंचाईवर मात करण्यासाठी भरीव योजना होती. पावसाअभावी भूजल पातळी खालावली असली भविष्यात जोरदार पाऊस झाला तर पुन्हा जलस्तर वाढण्याची शाश्‍वती आहे. काळगावलगत १३२९ हेक्टर वनक्षेत्र आहे.

संयुक्त वनव्यवस्थापन समिती व ग्रामस्थांच्या सहभागाने वनसंवर्धन झाले आहे. यामुळे बिबटे, तडस, वानरे, हरिण, कोल्हे, लांडगे, ससे, मोर, तीतर, कबुतरे यासारखे वन्य पशू-पक्षी मोठ्या संख्येने आहेत. या प्राण्यांना वनविभाग, वन व्यवस्थापन समितीच्या प्रयत्नातून झऱ्यात उपलब्ध केलेल्या पाण्याचा मोठा आधार ठरू लागला आहे.

"वनक्षेत्रातील बुजलेल्या झऱ्यांचे खोलीकरण केल्यास जलसाठा उपलब्ध होऊ शकतो. काळगावच्या ‘जुन्या गाव’ वनक्षेत्रात वनविभागाच्या सहकार्यातून झऱ्यात पाणी सापडल्याने वन्यपशूंची तुर्तास तृष्णा भागणार आहे. भविष्यात अशाप्रकारच्या बुजलेल्या झऱ्यांचे खोलीकरण केले जाईल." - डी. आर. अडकिने, वनपरिक्षेत्राधिकारी, पिंपळनेर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT