On the day of Chaitra Ashtami, Dhandai Devi's Mana Tagtrao ready for procession. In the second picture, an attractive idol of Dhandai Devi.
On the day of Chaitra Ashtami, Dhandai Devi's Mana Tagtrao ready for procession. In the second picture, an attractive idol of Dhandai Devi. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : आदिमाया धनदाईदेवीचा उद्यापासून यात्रोत्सव! मध्य प्रदेश, गुजरातमधून भाविक हजेरी लावणार

सकाळ वृत्तसेवा

दगाजी देवरे‌ : सकाळ वृत्तसेवा

म्हसदी : येथील ७७ पेक्षा अधिक कुळांची कुलदैवत असलेल्या आदिमाया धनदाईदेवीच्या यात्रोत्सवास मंगळवार (ता. १६)पासून प्रारंभ होत आहे. धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळ, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी यात्रोत्सवाची तयारी पूर्ण केली असून, विविध व्यावसायिक दाखल झाले आहेत. मंडळाने मंदिरासह गाव विकासाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. देवी नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा असल्याने राज्यासह मध्य प्रदेश व गुजरातमधून नवसपूर्ती व दर्शनासाठी हजेरी लावतात. (Dhule Yatra festival of Adimaya Dhandai Devi marathi news)

म्हसदी (ता. साक्री जि. धुळे) येथे डोंगराच्या कुशीत धनदाईमातेचे शेकडो वर्षांपूर्वीचे पुरातन मंदिर आहे. स्वयंभू मूर्ती असल्याने वर्षभर या ठिकाणी लाखो भाविक मातेच्या चरणी नतमस्तक होतात. श्रावण महिना, नवरात्रोत्सवासह चैत्र अष्टमीच्या यात्रोत्सवात देवीजवळ लाखो भाविकांची वर्दळ असते.

नवसाला पावणारी देवी म्हणून दिवसेंदिवस भाविकांची श्रद्धा वाढतीच आहे. धनदाईदेवीची मंगळवारपासून (ता. १६) यात्रा होत आहे. मंदिराचा कारभार धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळ पाहते. मंडळाने गेल्या काही वर्षांपासून भाविकांच्या देणगीतून मंदिर परिसराचा कायापालट केला आहे.

नवसपूर्ती व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो. हा बदल भाविकांनी सढळपणे दिलेली देणगी, भाविकांची वाढती संख्या व मंदिर प्रशासनामुळे झाला आहे. दर्शनासाठी येणारे भाविक मंदिर परिसरातील सुविधा, विकासकामे पाहून देणगी देतात.

गावापासून दीड किलोमीटरवर देवीचे मंदिर आहे. धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळ धार्मिक अधिष्ठानासह पर्यावरणाच्या संवर्धनाचे मोठे काम करत आहे. १९७३ मध्ये गावातील १७ तरुणांनी एकत्र येत मंदिराचा जीर्णोद्धार केला. याच १७ तरुणांनी पुढे धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळाची स्थापना केली. मंडळाने भाविकांना सुविधा देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत अनेक समजोपयोगी उपक्रम राबविले आहेत.  (latest marathi news)

तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम

मंदिराजवळ चैत्रोत्सव, नवरात्रोत्सव, दर पौर्णिमा, अष्टमीला पहाटे सामुदायिक काकड आरती केली जाते. चैत्रात अष्टमी व नवमीपासून मोठा यात्रोत्सव असतो. या काळात‌‌ लाखो भाविक हजेरी लावतात. तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होतील. सोमवारी (ता. १५) सायंकाळी सात ते रात्री अकरापर्यंत देवीची पालखी मिरवणूक काढण्यात येईल.

अष्टमीच्या दिवशी (ता. १६) पहाटे साडेपाचला सरपंच शैलजा देवरे, ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत सामुदायिक काकड आरती होईल. दुपारी चारला तगतरावाची (लांगड) मिरवणूक काढण्यात येईल. रात्री दहाला करमणुकीसाठी भीमा-नामा यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल.

बुधवारी(ता. १७) अमरावती नदीपात्रात दिवसभर कुस्त्यांची दंगल होईल. गुरुवारी (ता. १८) रात्री दहाला पुन्हा करमणुकीसाठी शुभमकुमार धुळेकर यांचा तमाशाचा कार्यक्रम होईल. देवीच्या पालखी मिरवणुकीत विशेषत: गावातील सर्व तरुण, भजनी मंडळ, स्वाध्याय परिवार, स्वामी समर्थ केंद्र, सत्संग मंडळासह गावातील सर्व धार्मिक मंडळे सहभागी होतील.

"धनदाईदेवीस कुलदैवत मानणारे भाविक राज्यभर आहेत. भाविकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तरुण ऐक्य मंडळाचे प्रयत्न असतात. उन्हाची काळजी घेत नवसपूर्तीचे कार्यक्रम पूर्ण करावेत."-सुभाष देवरे, अध्यक्ष, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळ

"धनदाईदेवी नवसाला पावते म्हणून दर वर्षी गर्दी वाढतीच आहे. देवीच्या यात्रोत्सवासाठी सर्व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य असते."-महेंद्र देवरे, सचिव, धनदाईदेवी तरुण ऐक्य मंडळ

मंडळाची कार्यकारिणी

अध्यक्ष- सुभाष देवरे, उपाध्यक्ष- काशीनाथ देवरे, खजिनदार- उत्तमराव देवरे, सचिव- महेंद्र देवरे, संचालक- यशवंतराव देवरे, गंगाराम देवरे, रघुनाथ देवरे, हिंमतराव देवरे, सुधाकर देवरे, निरंजन देवरे, सुनील देवरे, राकेश देवरे, सुरेश जैन, विनयकुमार देवरे, अनिल देवरे, नरेंद्र देवरे, डॉ. अमितकुमार चव्हाण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT