Entered skywatching. In second photograph, idol of Shri Khanderao Maharaj. esakal
उत्तर महाराष्ट्र

Khandoba Yatrotsav : शिरपूरमध्ये आजपासून खंडेराव महाराजांचा यात्रोत्सव

Khandoba Yatrotsav : सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत श्री खंडेराव महाराजांच्या यात्रेस माघ शुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर शनिवार (ता. २४) पासून सुरवात होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : येथील सुमारे अडीचशे वर्षांची परंपरा असलेल्या ग्रामदैवत श्री खंडेराव महाराजांच्या यात्रेस माघ शुद्ध पौर्णिमेच्या मुहूर्तावर शनिवार (ता. २४) पासून सुरवात होणार आहे. महाशिवरात्रीपर्यंत चालणाऱ्या यात्रेसाठी संयोजक श्री खंडेराव बाबा विकास संस्था व पालिकेने तयारी पूर्ण केली आहे.

सकाळी नऊला श्री खंडेराव महाराजांची महाआरती आमदार काशीराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.(Yatrotsav of Khanderao Maharaj from today in Shirpur)

मानकरी, संस्थानच्या सेवकांसह यात्रोत्सवासाठी सहकार्य करणाऱ्यांचा सत्कार संस्थानतर्फे केला जाणार आहे. त्यानंतर यात्रेला औपचारिक सुरवात होणार आहे. मसाले, धातूंची भांडी व अन्य उपकरणे यासाठी शिरपूरची यात्रा प्रसिद्ध आहे. यात्रेच्या दोन दिवसांपूर्वीच संबंधित विक्रेते डेरेदाखल झाले आहेत.

आबालवृद्धांचे आकर्षण असलेले आकाशपाळणे, मेरी गो राउंड, डिस्को पाळणा, सलाम्बो, स्काय ट्रेन, मौत का कुआँ आदींचीही उभारणी करण्यात आली. पन्नालाल गधा, डॉग शो, जादूचे प्रयोग हे बालगोपाळांत लोकप्रिय मनोरंजनाचे खेळही यंदा पाहायला मिळणार आहेत.

त्यासोबतच मिठाई, पावभाजी, चायनीज खाद्य पदार्थांचे लहान-मोठे स्टॉल्सही सज्ज आहेत. यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेली व लाडकी या नावाने प्रसिद्ध गुळाची जिलबी, गोडीशेव, चिवडा, पापडी, शेव विक्री करणारी हलवायांची दुकानेही थाटण्यात आली आहेत.

अश्वबाजार सजला

सारंगखेडा येथील यात्रेपाठोपाठ शिरपूरचा पशूबाजार प्रसिद्ध असून, जातिवंत अश्वांच्या विक्रीतून दर वर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. येथील बाजार समितीच्या आवारात पशूबाजार भरविला जात असू,न उत्तम जातीचे बैल, गायी, म्हशी, रेडेही येथे विकले जातात.

पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थानमधून अश्व घेऊन आठवडाभरापूर्वीच व्यापारी दाखल झाले आहेत. पालिका व संस्थानतर्फे व्यावसायिकांना जागा, पाणी आणि विजेची सुविधा उपलब्धता करून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT