Zilla Parishad School which is one hundred and sixty years old. In the second and third picture, the banner that is going viral on social media is showing the importance of Marathi school. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Digital Marathi School: ...आता पुन्हा मराठी शाळांचा डंका! शाळा झाल्या डिजिटल; कात टाकल्याने वाढले प्रवेश

Dhule News : मराठी शाळा डिजिटल झाल्या आहेत. पारंपरिक गुरुजी, सर, तर बाई आता ‘टीचर’ झाल्या आहेत.

सकाळ वृत्तसेवा

कापडणे : राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू होत आहेत. आता शाळाप्रवेशासाठी लगीनघाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. चांगल्या शाळेत प्रवेश घ्यायचा मग धावपळ करावीच लागेल, असेही कानी पडत आहे. मात्र ग्रामीण भागातील मराठी शाळांनी कात टाकली.

मराठी शाळा डिजिटल झाल्या आहेत. पारंपरिक गुरुजी, सर, तर बाई आता ‘टीचर’ झाल्या आहेत. अर्थात तसे संबोधले जाऊ लागले आहे. शाळांची गुणवत्ता वाढत असल्याने बहुतांश पालकांची पावले मराठी शाळेकडे वळू लागली आहेत. (Dhule zp digital Marathi school)

जिल्हा परिषदेची शाळा म्हटली म्हणजे नाके मुरडणाऱ्यांची कमी नाही. इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये टाकले म्हणजे आम्ही चिंतामुक्त झालो, असे म्हणणाऱ्यांचीही कमी नाही. म्हणून गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमातील शाळांना ‘अच्छे दिन’ पाहायला मिळाले. पण कोरोनानंतर मराठी शाळांना अच्छे दिन आले आहेत.

पावले वळती मराठी शाळेकडे

मराठी शाळांची रंगरंगोटी, परसबाग, डिजिटल वर्ग, बऱ्याच ठिकाणी सुरू झालेले सेमी इंग्लिश माध्यमाचे वर्ग आणि सततच्या प्रशिक्षणामुळे अपडेट झालेले शिक्षक अशा विविध कारणांमुळे मराठी शाळांनी कात टाकली आहे. गुणवत्ताही कमालीची उंचावली आहे. ग्रामीण भागात मराठी शाळांमधील प्रवेश वाढले आहेत. (latest marathi news)

मराठी शाळेतील सुविधा

मराठी शाळांमध्ये पुस्तके, गणवेश, दप्तर आदी मोफत मिळते. मध्यान्ह भोजनाची सुविधा आहे. उच्च शिक्षित आणि प्रशिक्षित शिक्षक वर्ग आहे. विविध सांस्कृतिक व क्रीडात्मक उपक्रम सुरू असतात. गुणवत्ता चाचण्या घेतल्या जातात आदींमुळे मराठी शाळांकडे प्रवेशाचा कल वाढल्याचे पाहायला मिळत आहे.

शनिवारी दप्तरविना शाळा

धुळे जिल्ह्यात प्रत्येक शनिवारी दप्तरविना शाळा उपक्रम राबविला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांमधील उपजत कलागुणांना मोठी संधी मिळत आहे. परिपाठामुळे तर संस्कारक्षम पिढी घडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert: मुंबईत पावसाची रिपरिप सुरूच, पुढील काही दिवस अलर्ट जारी; हवामान विभागाची महत्त्वाची माहिती

आशीष शेलार आमच्या सोबत या! उद्धव ठाकरेंनी केलं शेलारांचे कौतुक, फडणवीसांना ठरवलं पप्पू?

६० व्या वाढदिवसाला शाहरुख मन्नतबाहेर आलाच नाही; पोस्ट करत सांगितलं कारण, म्हणाला, 'माफी मागतो पण...

अर्ध शरीर ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा मदतीसाठी टाहो, बाजूला २० मृतदेह पडलेले; घटनास्थळी हादरवणारं दृश्य

Latest Marathi News Live Update : पुणे-बेंगळुरू महामार्गावर भीषण अपघात

SCROLL FOR NEXT